जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काधी पाहिलीय मुंग्याची चटणी, मिरची आणि मसाल्यासोबत बनवताना Video Viral

काधी पाहिलीय मुंग्याची चटणी, मिरची आणि मसाल्यासोबत बनवताना Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

भारतात अनेक प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. धने, पुदिना, खोबरे, आंबा इत्यादींची चटणी लोक उत्साहाने खातात. पण तुम्ही कधी मुंगीची चटणी खाल्ली आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै : भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहताता. त्यामुळे त्यांच्या परंपरा आणि चालिरिती देखील वेगवेगळ्या असतात. काहींबद्दल आपल्याला सिनेमा आणि सोशल मीडियामुळे माहिती मिळते. पण असं असलं तरी देखील बहुतांश भागाबद्दल आणि तेथील नवीन पदार्थांबद्दल आपल्याला माहिती नसतं. कधीकधी असेच काही विचित्र पदार्थ आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. असाच एक विचित्र पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही म्हणाल की हे काय आता नवीन खरंतर जेवणाची चव वाढवण्यासाठी भाज्या आणि डाळींव्यतिरिक्त लोक लोणचे आणि चटण्याही खातात. भारतात अनेक प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. धने, पुदिना, खोबरे, आंबा इत्यादींची चटणी लोक उत्साहाने खातात. पण तुम्ही कधी मुंगीची चटणी खाल्ली आहे का? कोणी कोळी तर कोणी खातोय किड्यांचं बिस्किट; जगातील weird Dish ऐकून येईल उलटी आम्ही मस्करी करत नाहीय. तर खरंच लाल मुंग्यांच्या चटणीबद्दल बोलत आहोत, जी फक्तभारतातच बनवली जाते. ही चटणी नुसती बनलीच जात नाही तर ती मोठ्या उत्साहाने खायलाही लोकांना आवडते. मिरच्या आणि मसाल्यांनी भरलेल्या कढईत या मुंग्यांना शिजवलं जातं आणि त्यांची चटणी तयार केली जाते. ही चटणी कशी बनवली जाते याची संपूर्ण पद्धत सोशल मीडियावर शेअर केली गेली आहे, ज्यानंतर ती व्हायरल झाली.

जाहिरात

भारतातील झारखंड राज्यातील लोक लाल मुंगीची चटणी बनवतात आणि आवडीने खातात देखील. येथील आदिवासींना ही चटणी खूप आवडते. त्यासाठी हे आदिवासी जंगलात जाऊन मुंग्यांची घरटी शोधतात. झाडांवर चढून ते तोडतात. त्यानंतर त्यांनी स्वच्छ करून पॅनमध्ये चांगले शिजवले जातात. चटणीची चव वाढवण्यासाठी त्यात मिरची आणि मसाले टाकले जातात. यानंतर सर्वजण ते मोठ्या उत्साहाने खातात. ही चटणी बनवण्याची पद्धत सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. हे पाहिल्यानंतर अनेकांनी याला घृणास्पद म्हटले. अनेकांनी लिहिलं की ही पण खायची गोष्ट आहे का? तर काहींनी चीनशी तुलना केली आहे. झारखंडमध्ये अनेक जमातीचे लोक राहतात. ही चटणी या आदिवासींच्या जेवणाचा एक भाग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात