प्रत्येक देशाचे खाद्यपदार्थ आणि त्यांची संस्कृती ही वेगळी असते. ज्याबद्दल नव्याने ऐकून आपल्याला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. जगभरातील खाद्यपदार्थांचा विचार केला तर ते आणखी किती वेगळे असू शकतात? असं तुमच्या मनात येऊ शकतं. म्हणून आम्ही तुमच्यासाठी विचित्र पदार्थांची लिस्ट आणली आहे. चला एक नजर टाकू.
कझाकिस्तानचे रॉक ऐकायला खूप विचित्र वाटतं पण कझाकस्तानमध्ये बरेच लोक हे रॉक किंवा दगड खातात. हे खडक खाण्यायोग्य असतात, या तुकड्यांना चिकणमाती असे म्हणतात. जे लोक ते खातात ते असा दावा करतात की ते स्नॅक्स म्हणून खातात आणि त्यात भरपूर लोह असते जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. जरी बहुतेक डॉक्टर या दाव्याला पूर्णपणे विरोध करतात.
चीनमधली सडलेली अंडी घरात पडलेल्या कुजलेल्या अंड्यांचा दुर्गंध तुम्ही कधी घेतलाय? हा दुर्गंध खूपच घाण असतो. इतकं की कधी-कधी लोकांला उलटी येते, ज्यामुळे अंड खराब झालं की आपण ते ताबडतोब फेकून देतो. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की चीनमध्ये अंडी माती आणि राखेत महिनोमहिने दाबून कुजवली जातात जेणेकरून ते चवीने खाता येतील.
आइसलँडर कुजलेले शार्क कुजलेल्या शार्क माशांपासून बनवलेले डिश देखील खाल्ली जाते हे ऐकून तुम्हाला पोटात कसंतरी होईल, पण येथील लोक हे खाकता. बास्किंग शार्कच्या कुजलेल्या शवापासून बनवलेली डिश हा आइसलँडिक फूड टेबलचा एक महत्त्वाचा भाग आहे. याला हकराल म्हणतात. यासाठी, शार्कला खड्ड्यात पुरले जाते आणि त्याला दगडांनी ठेचले जाते, ज्यामुळे त्याच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात.
जपानमध्ये वॉस्प (गांधील माशी) बिस्किटे जिबाची सेनबेई म्हणून ओळखले जाणारे, हे एक खास बिस्किट आहे. ते गोड किंवा चवदार नाही तर, ते गांधील माशींनी भरलेले आहे. गांधील माशी स्टफिंग व्यतिरिक्त, त्यात पाणी, अंडी, तांदळाचे पीठ, साखर, मीठ, तेल, तीळ आणि सोया सॉस टाकून तयार केले जाते. जे लोक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत त्यांना या विचित्र पदार्थांबद्दल कधीच आश्चर्य वाटत नाही, उलट त्यांना ते आवडते.
कंबोडियामध्ये तळलेला कोळी घरामध्ये कोळी किंवा जाळी दिसल्यास आपण झाडू किंवा काठीच्या साहाय्याने त्याला काढून बाहेर फेकून देतो, परंतु हे आश्चर्यकारक आहे की काही लोकांना कोळी खायला आवडते. फ्राईड स्पायडर हा कंबोडियातील स्कौएन शहरातील अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. कोळी साखर आणि मीठ यांच्या मिश्रणात मॅरीनेट करून नंतर लसूण लावून तळले जातात.