तिरुवनंतपुरम, 14 मार्च : “एका फोन कॉलने माझं आयुष्य बदललं. मागच्या वर्षी काही दिवस आधी मी सुट्टीसाठी घरी परतणार होते. मला बाबांचा फोन आला. ते अस्वस्थ वाटत होते. काही मिनिटांनंतर, ते म्हणाले, ‘आई प्रेग्नंट आहे’. यावर कशी प्रतिक्रिया द्यावी ते मलाच कळेना. तुमच्या वयाच्या 23 व्या वर्षात तुमचे पालक तुम्हाला असं काही सांगतील याची अपेक्षाच नसते” हे सर्व वाचल्यानंतर तुम्हाला ‘बधाई हो’ फिल्मची आठवण नक्की झाली असेल. पण ही कोणती फिल्मी स्टोरी नव्हे तर रिअल स्टोरी आहे. एक 23 वर्षांची तरुणी जी आपल्या आईवडिलांची एकुलती एक लेक होती, तिच्या आईवडिलांनी तिला वयाच्या 23 व्या वर्षी गूड न्यूज देत जबर धक्का दिला. तरुणी म्हणाली, “लहानपणी मी आईला नेहमी म्हणायचे की मला एक भावंडं हवं. पण आई म्हणाली होती की माझ्या जन्मानंतर तिला गर्भाशयात काही समस्या होती, ज्यामुळे ती पुन्हा गर्भधारणा करू शकणार नाही. त्यानंतर मी मोठे झाले. कॉलेजसाठी बंगळुरूला गेले. आईबाबा केरळमध्ये राहिले. मला तो कॉल येईपर्यंत सर्व गोष्टी जशास तशा होत्या. बाबांनी मला ही बातमी दिल्यानंतर ते म्हणाले की त्यांनी ही गोष्ट गुप्त ठेवली आहे कारण मी कशी प्रतिक्रिया देईन हे त्यांना माहीत नव्हतं. मला धक्का बसला असं म्हणणं कमीपणाचं ठरेल. मला माहित आहे की हे विचित्र वाटेल पण जेव्हा बाबांनी मला सांगितले, तेव्हा आई तिच्या प्रेग्नन्सीच्या 8व्या महिन्यात होती. खरं तर जेव्हा आईला हे कळलं तेव्हा ती 7 महिन्यांची प्रेग्ननंट होती.” बापरे बाप! आता याला काय म्हणावं? बाळाला पाहून आईबाबाला धक्का, नर्स-डॉक्टरही शॉक “काही दिवसांनी मी घरी पोहोचले तेव्हा मी आईच्या मांडीवर पडून रडले. त्यानंतर आई आणि मी एकत्र वेळ घालवू लागलो. तेव्हा तिने मला त्यांना हे सर्व कसं कळलं ते सांगितलं. आई आणि बाबा एका मंदिरात गेले होते, तिथं तिला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन पडली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ती प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. काही कारणामुळे तिचं बेबी बम्प दिसत नव्हतं. तिची मासिक पाळी थांबली होती, तिला फुगल्यासारखं वाटत होतं, पण रजोनिवृत्ती असावी असं तिला वाटलं. आणि इतक्या वर्षांपूर्वी डॉक्टरांनी तिला जे सांगितलं होतं, त्यामुळे गर्भधारणा तिच्या मनातही आली नाही. मला वाटतं की हा एक चमत्कार आहे.
“नंतर मला वाटलं की मला लाज काय वाटायला हवी. कित्येक दिवसांपासून मला हेच तर हवं होतं. हळूहळू आम्ही आमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगितलं. काही जणांनी चिंता व्यक्त केली तर काही जणांनी टोमणेही मारले. पण आम्ही लक्ष दिलं नाही. म्हणूनच आईची गर्भधारणा सुरळीत पार पडली. कोणताही ताण नव्हता. तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो ‘प्रेग्नंट’; दिसतात अशी लक्षणं “गेल्या आठवड्यातच आईने एका मुलीला जन्म दिला. आयुष्य इतकं कधीच अधिक अर्थपूर्ण झालं नाही. ती मला कधी दीदी म्हणेल याची प्रतीक्षा आता मला लागली आहे”, असं ती म्हणाली.
“म्हणजे, लोकांना हे विचित्र वाटते की आपल्या वयात इतकं मोठं अंतर आहे, पण त्यामुळे काही फरक पडतो का? गंमत अशी आहे की ती आमच्या आयुष्यात येणार आहे हे आम्हाला फार काळ माहित नव्हते आणि आता ती आली आहे, आम्ही तिच्यापासून दूर राहू शकत नाही!” मुलगी झाली हो! भारतातील ‘या’ समाजात प्रत्येकाला हवीये मुलगी; कारण मात्र संतापजनक ह्युमन्स ऑफ बॉम्बे फेसबुक अकाऊंटवर ही स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.