जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुलगी झाली हो! भारतातील 'या' समाजात प्रत्येकाला हवीये मुलगी; कारण मात्र संतापजनक

मुलगी झाली हो! भारतातील 'या' समाजात प्रत्येकाला हवीये मुलगी; कारण मात्र संतापजनक

मुलगी झाली हो! भारतातील 'या' समाजात प्रत्येकाला हवीये मुलगी; कारण मात्र संतापजनक

मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करणाऱ्या या समाजाचं तुम्हाला कौतुक वाटेल पण त्यामागील कारण वाचलं तर तुमचाही संताप होईल.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ, 09 मार्च : भारतात अद्यापही असे कित्येक लोक आहेत, ज्यांना कुटुंबात वंशासाठी दिवा म्हणून मुलगाच हवा आहे. त्यामुळे काही लोक तर गर्भात मुलगी असल्याचं समजताच पोटातच तिचा जीव घेतात किंवा जन्मानंतर तिला फेकून देतात, मारून टाकतात. काही लोक तर एक तरी मुलगा हवा म्हणून मुलींची रांगही लावतात. मुलांसाठी असा अट्टाहास होत असताना भारतातील असा एक असा समाज जिथं मुलींसाठी अट्टाहास असतो. म्हणजे मुलगी झाली की इथं प्रत्येकाला आनंद होतो. तसं तुम्हाला हे खूप कौतुकास्पद वाटेल पण त्यामागील कारण वाचलं तर तुमचाही संताप होईल. मध्य प्रदेशच्या बांछडा समाजात मुलींचा जन्म होताच आनंदोत्सव असतो. अगदी जल्लोषात तिचं स्वागत होतं. या समाजातील प्रत्येकाला मुलगीच हवी असते. त्या मुलींचं चांगलं पालनपोषन करून त्यांना वाढवलं जातं. त्यानंतर कामही करायला दिलं जातं. पण त्यामागील कारण मात्र धक्कादायक आहे. मुलींना दिलं जाणारं कामही असं, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल, कोणताही समाज आणि सरकारही चिंतेत पडेल. हा समुदाय मूळचा मध्य प्रदेशमधील. रतलाम, मंदसौर, नीमच या परिसरातील हे लोक. अफिमच्या शेतीसह देहव्यापारही करतात. या समाजातील लोक देहविक्री करून आपलं घर चालवतात. मुलगी जन्माला येणं म्हणजे घर चालवण्यात आणखी एका व्यक्तीचा हातभार लागणं.  इथं आईच आपल्या मुलीला देहविक्रीचे धडे देते. कित्येक वेळा तर आईच आपल्या मुलीसाठी ग्राहक आणते. नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस या समाजातील महिलांसाठी काम करणारी संस्था नारी आभा सामाजिक चेतना समितीचे संयोजक आकाश चौहान यांनी सांगितलं, मंदसौर, नीमच और रतलाम जिल्ह्यातील 75 गावांत बांछडा समाजाचे 23,000 लोक राहतात. त्यापैकी जवळपास  2000  पेक्षा अधिक महिला आहेत ज्या देहव्यापारच करतात. या समाजात महिलांची संख्या जास्त आहे. एका रिपोर्टनुसार महिला सशक्तीकरण विभागाने 2015 साली केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 38 गावांत 1047 बांछडा कुटुंबाची एकूण लोकसंख्या 3435 होती. त्यापैकी 2243 महिला होत्या तर पुरुष फक्त 1192 होते. म्हणजे पुरुषांच्या दुप्पट महिला होत्या. तर नीमच जिल्ह्यात 2012 सालच्या सर्वेक्षणानुसार 24 गावांत 1319  बांछडा कुटुंबात 3595 महिला आणि 2770 पुरुष होते.

News18लोकमत
News18लोकमत

या समाजात मुलींची संख्या जास्त आहे कारण मुलींची संख्या वाढवण्यासाठी त्यांची खरेदीही केली जाते.  गरीब कुटुंबातील मुलींना खरेदी करून त्यांचं पालनपोषन करून त्यांना मोठं केलं जातं. वयात येताच त्यांना देहव्यापारात ढकललं जातं. 2 हजारांपासून 10 हजारांपर्यंत त्यांची किंमत लावली जाते. आरटीआय कार्यकर्ते वकील अमित शर्मा यांच्या मते, हा पूर्णपणे सुनियोजित असा व्यवसाय आहे. मुलींच्या खरेदी-विक्रीसाठी कायदेशीर रजिस्ट्रीही असते. फक्त पैसे कमावण्यासाठी नव्हे तर कपडे आणि जेवणासाठीही या समाजाच्या मुलींना देहव्यापार करावा लागतो. Shocking! एक वर्षाची चिमुकली ‘प्रेग्नंट’; पोटाऐवजी डोक्यात वाढत होतं मूल जोपर्यंत मुलींना मागणी आहे तोपर्यंत त्यांच्याकडून धंदा करून घेतला जातो. त्यानंतर तिचं लग्न लावून दिलं जातं. जेणेकरून ती आणखी मुलींना जन्म देईल. एका रिपोर्टनुसार या मुलींशी लग्न करण्यासाठी मुलांना लाखो रुपये द्यावे लागतात. त्यामुळे बहुतेक तरुणांचं लग्नच झालेलं नाही. ज्यांचं लग्न होतं, त्यांची मुलंही असंच आयुष्य जगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात