मुंबई, 01 फेब्रुवारी : आपल्या आसपास अशा काही घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न असतो. असाच एक भयावह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका चिमुकलीच्या रूममध्ये तिच्या वडिलांना असं काही दिसलं की त्यांना दरदरून घाम फुटला. हा भयावह व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
एक लहान मुलगी आपल्या खोलीत एकटीच आहे. तिचे वडील तिला भेटायला जातात. ते मोबाईलमध्ये शूटही करत असतात. जसे ती तिच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचतात तेव्हा जे समोर दिसतं ते पाहून त्यांना धडकीच भरते. ते इतके घाबरतात की पळत आपल्या मुलीकडे जातात पण तिथं जाऊन त्यांना आणखी मोठा धक्का बसतो. कारण काय ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
हे वाचा - 2 भावांच्या सेल्फीत दडलंय भयानक दृश्य; PHOTO झूम करताच तुमच्या अंगावरही काटा येईल
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती कॅमेरा घेऊन आपल्या मुलीच्या खोलीत जातो. त्याची मुलगी पाठमोरी बेडवर बसलेली आहे. जसा तो दरवाजाजवळ पोहोचतो. तेव्हा त्याला त्याच्या मुलीसमोर दुसरी मुलगी दिसते. जी डोकावून त्या व्यक्तीकडे पाहते. व्यक्ती धावत धावत आपल्या मुलीजवळ जातो. तेव्हा तिथं कुणीच नसतं. त्याची मुलगी केस मोकळे सोडून एकदम शांत बसलेली दिसते. आधी त्या मुलीसह दुसऱ्या मुलीचाही चेहरा दिसतो पण जवळ जाताच ती मुलगी गायब होते.
हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. pakistani__dresses इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ती दुसरी मुलगी भूत असल्याचा दावा केला जातो आहे. भूतप्रेत, आत्मा बाबत बरेच दावे केले जातात. काही लोक याला मानतात तर काही नाही. फिल्ममध्येही भूत दाखवले जातात. तर काही जण आपल्याला प्रत्यक्षात भूत दिसल्याचंही सांगतात.
त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा व्हिडीओ भयानक वाटला आहे. तर कुणी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horror, Viral, Viral videos