मराठी बातम्या /बातम्या /Viral /

2 भावांच्या सेल्फीत दडलंय भयानक दृश्य; PHOTO झूम करताच तुमच्या अंगावरही काटा येईल

2 भावांच्या सेल्फीत दडलंय भयानक दृश्य; PHOTO झूम करताच तुमच्या अंगावरही काटा येईल

2 भावांचा खतरनाक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल.

2 भावांचा खतरनाक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल.

या एका सेल्फीमुळे या मुलांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. ते इतके घाबरले आहेत की एकटं झोपायलाही त्यांना भीती वाटते.

    लंडन, 18 ऑगस्ट : सध्या सेल्फीचा जमाना आहे. कुणीही, कुठेही आणि कसंही सेल्फी घेतं. पण काही वेळा या सेल्फीत असं काही कैद होतं, ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. असंच घडलं ते दोन भावांसोबत. ज्यांनी खेळता खेळता आपला सेल्फी क्लिक केला आणि तो झूम करून पाहताच त्यांना घाम फुटला. भावंडांचा हा सेल्फी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो झूम करून पाहताच तुमच्याही अंगावर काटा येईल. 12 वर्षांचा क्रिस्टिना अश्मोर आणि 14 वर्षांचा ग्रेबिअल अश्मोर हे दोघं भाऊ, एकत्र एका प्लेग्राऊंडवर खेळत होते. खेळता खेळता ते जुन्या टायरच्या ढिगाऱ्यांजवळ गेलं. तिथं सेल्फी घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यांनी टायरचा टॉवर बनवला आणि त्याच्या आत क्रिस्टिना गेला. टायरच्या बाहेर गेब्रिअल उभा राहिला. त्याने आपल्या हातात मोबाईल धरला. दोघांनी कॅमेऱ्याकडे पाहून क्युट स्माईल दिली आणि फोटो क्लिक केला. फोटो काढल्यानंतर सर्वात आधी तो पाहण्याची उत्सुकताही आपल्याला असते. या दोन्ही भावांनीही तेच केलं. त्यांनी फोटो पाहिला, तो झूम करून पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच तो फोटो आपल्या आईलाही पाठवला. फोटोत जे दिसलं ते पाहून त्यांची आईही घाबरली. पण मुलं मुद्दामहून आपल्यासोबत मस्ती करत असावेत, त्यांनी फोटो एडिट केला असावा असं तिला वाटलं. पण मुलं इतकी घाबरली की आईलाही हा फोटो एडिटेड असावा असं वाटत नाही. हे वाचा - PHOTO : जवळ असून हरणांनाही दिसला नाही, तुम्हाला सापडतोय का बघा; शिकारीसाठी दबा धरून बसलाय चित्ता आता असं या फोटोत नेमकं दिसलं तरी काय, हे तुम्हालाही पाहायचं आहे का? तर हा फोटो नीट झूम करून पाहा. टायरमधील या मुलाच्या मागे एका लहान मुलीचा चेहरा दिसतो आहे. जी या भावांसोबत कॅमेऱ्याकडे पाहत आहे. टायरमध्ये इतकी जागा तर दिसत नाही की तिथं दुसरं कुणी राहू शकेल आणि या मुलांच्या मते, तिथं प्रत्यक्षात अशी कोणतीच मुलगी नव्हती. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बहुतेकांनी तो एडिटेड असावा, फोटोशॉप केलेला असावा असं म्हटलं आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार मुलांनी आणि त्यांच्या आईने सांगितल्यानुसार हा फोटो एडिडेट नाही. मुलं इतकी घाबरली आहेत की ती आता एकटी झोपायला घाबरतात आपल्यासोबतच झोपतात असं त्यांची आई म्हणाली. हे वाचा - पॉटी होईना म्हणून डॉक्टरांकडे नेलं; एक्स-रेमधून बायकोसमोर आलं नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Horror, Selfie, Selfie photo, Viral, Viral photo

    पुढील बातम्या