मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कुठे दिसते विचित्र महिला तर कुठे शीर नसलेला माणूस; मध्यरात्रीच्या वेळी राज्यातील या रस्त्यांवर फिरतो मृत्यू

कुठे दिसते विचित्र महिला तर कुठे शीर नसलेला माणूस; मध्यरात्रीच्या वेळी राज्यातील या रस्त्यांवर फिरतो मृत्यू

कुठे दिसते विचित्र महिला तर कुठे शीर नसलेला माणूस

कुठे दिसते विचित्र महिला तर कुठे शीर नसलेला माणूस

सतत मृत्यू या रस्त्यांवर फिरत असतो. जिथे कधी शीर नसलेला माणूस गाड्यांना आडवा येतो तर कधी विचित्र महिला दिसते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी:  कुठेही फिरायला जायचं म्हंटलं की आपण साधारणतः सकाळी किंवा पहाटे निघतो आणि रात्री परत येतो. पण जर ट्रिप दूरची असली तर आपल्याला रात्रीच्या वेळीही प्रवास करावा लागतो. ट्रक ड्रायव्हर्स किंवा टॅक्सी ड्रायव्हर्स रात्रीच्या वेळीच प्रवास करणं पसंत करतात. पण रात्रीच्या वेळी प्रवास करणं म्हणजे आपल्यासोबत असतो अंधार, असते भीती आणि असतात काही अशा शक्ती ज्यांच्याबद्दल आपण ऐकलं किंवा वाचलेलं असतं. अमुक अमुक रोडने रात्री जाऊ नये असं आपण ऐकलंच असतं. तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील असेरस्ते माहिती आहेत का? जिथे ट्रॅफिक तर चोवीस तास असतं मात्र सतत मृत्यू  या रस्त्यांवर फिरत असतो. जिथे कधी शीर नसलेला माणूस  गाड्यांना आडवा येतो तर कधी विचित्र महिला दिसते. जाणून घेऊया अशाच भयाण आणि भीतीदायक रस्त्यांबद्दल.

कसारा घाट, मुंबई नाशिक महामार्ग

कसारा घाट हा मुंबई नाशिक महामार्गावर आहे. रहस्यमय घटनांमुळे हे ठिकाण अनेकदा चर्चेत आले आहे. येथे प्रवास करणाऱ्या अनेकांनी आपला भीतीदायक अनुभव लोकांमध्ये शेअर करताना सांगितले की, अनेकदा एक महिला येथे फिरताना दिसते, तिचे डोके कापले जाते. यापूर्वीही या ठिकाणी अनेक हृदयद्रावक घटना घडल्या आहेत.

कशेळी घाट, मुंबई गोवा महामार्ग

मुंबई गोवा हायवेवर असलेला कशेडी घाट हा अनेकदा घडलेल्या घटनांमुळे चर्चेत असतो. केवळ कशेडी घाटच नाही तर संपूर्ण मुंबई-गोवा हायवे गजबजला असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. येथे प्रवास करणाऱ्या लोकांच्या मते या ठिकाणी अनेक विचित्र घटना घडतात. अनेकदा वाहनाच्या आत ठेवलेले मांसाहार स्वतःच गायब होतो. अशा परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी प्रवास करत असाल तर चुकूनही मांसाहार करू नका.

ईस्टर्न एक्सप्रेस वे, ठाणे

अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार, या एक्सप्रेसवेवर एक अतिशय भितीदायक भूत फिरत आहे, ज्याची मान कापली आहे. आत्तापर्यंत अनेकांनी हे भूत तिथे पाहिल्याचा दावा केला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर अनेकदा अनेक रहस्यमय घटनाही घडतात.

पारशी स्मशानभूमी रोड, नागपूर

पारशी स्मशानभूमी, नागपूर नागपूरच्या पारशी स्मशानभूमीचीही राज्यात झपाटलेल्या यादीत गणना होते. पारसी स्मशानभूमी हे शहरातील सर्वात कुप्रसिद्ध ठिकाण मानले जाते ज्याचे नाव बहुतेक शहरवासीयांना माहित आहे. या स्मशानभूमीत जो कोणी जातो तो अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असतो, असे जाणकारांचे मत आहे. यादरम्यान अनेक जण मृत्यूच्या तोंडातही पोहोचतात. अनेकांचा असा विश्वास आहे की काही अदृश्य मानवी सावली येथे लोकांच्या मागे येते. अनेकांनी येथून विचित्र आवाजही ऐकले आहेत.

वरील सर्व गोष्टी या कहाणी किंवा इंटरनेटवर असलेल्या लोकांच्या अनुभवातून लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही घडल्या आहेत अथवा नाहीत याची जबाबदारी News18 लोकमत घेत नाही. या लेखाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही.

First published:

Tags: Maharashtra News