मुंबई, 30 जानेवारी : भारतीय उद्योग जगतात टाटा हे नाव मोठं आहे. देशातल्या या सर्वांत मोठ्या उद्योजक घराण्याविषयी नागरिकांच्या मनात कायम कुतूहल पाहायला मिळतं. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग जगतात मोठं यश मिळवलं आहे. टाटा सन्स एमिरेट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी त्यांचे धाकटे बंधू जिमी टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून उजाळा दिला. या पोस्टनंतर साहजिकच नेटकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं जिमी यांच्याविषयीचं औत्सुक्य वाढलं आहे. जिमी टाटांबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊ या. टाटा सन्स एमिरेट्सचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर धाकटे बंधू जिमी टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारा एक फोटो शेअर केला होता. रतन टाटा यांचा धाकट्या भावासोबत असलेला हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो 1945मध्ये काढलेला आहे. रतन टाटा यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुमारे 7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हा सुंदर फोटो त्यांनी या फॉलोअर्ससोबत नुकताच शेअर केला. ‘ते आनंदाचे दिवस. आमच्यात काहीही आले नाही. (1945मध्ये भाऊ जिमीसोबत)’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. जिमी टाटा हे टाटा अँड टाटा सन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा पॉवरमध्ये शेअर धारक आहेत. सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त जिमी यांना त्यांचे वडील नवल टाटा यांच्यानंतर हे पद मिळालं. नवल टाटा यांचं 1989मध्ये निधन झालं. सर रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाबाई यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातल्या तरुण जिमीला दत्तक घेतलं. Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video टाटा सन्स आणि टाटा समूहातल्या कंपन्यांमध्ये शेअरधारक असलेले 82 वर्षांचे जिमी टाटा यांनी त्यांचं लो प्रोफाइल कायम ठेवलं आहे. ते कुलाब्यातल्या 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्याकडे मोबाइल फोन नाही. ते अविवाहित आहेत. जिमी कधी तरीच घराबाहेर पडतात. यापूर्वी आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी 19 जानेवारी 2022 रोजी शेअर केलेल्या एका ट्विटच्या माध्यमातून जिमी यांना जगासमोर आणलं. हर्ष गोयंका यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, `तुम्हाला रतन टाटा यांचे धाकटे बंधू जिमी टाटा यांच्याविषयी माहिती आहे का? ते मुंबईत कुलाब्यामधल्या एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना व्यवसायाची फारशी आवड नव्हती. ते एक उत्तम स्क्वॅश खेळाडू असून, प्रत्येकी वेळी खेळताना ते मला पराभूत करत. लो प्रोफाइल व्यक्तिमत्त्व.`
रतन टाटा आणि जिमी टाटा यांना नोएल नावाचा आणखी एक भाऊ आहे. त्यांचा जन्म नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी झाला. नोएल हे दिवंगत सायरस मिस्त्री यांचे मेव्हणे आहेत. ते टाटा इंटरनॅशनलचे एमडी आणि ट्रेंटचे अध्यक्ष आहेत. रतन नवल टाटा यांनी काही दिवसांपूर्वी 28 डिसेंबर 2022 रोजी त्यांचा 85वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा जन्म 1937मध्ये मुंबईत झाला. रतन यांचं संगोपन त्यांच्या आजीने केलं. मुंबईतल्या कँपियन स्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून कॉर्नेल युनिव्हर्सिटी अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसह आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.