मुंबई, 11 फेब्रुवारी : बऱ्याच लोकांचा सकाळचा ब्रेकफास्ट हा ब्रेड असतो. मग तो चहा-ब्रेड असो, ब्रेड-बटर असो, ब्रेड-जाम असो, ब्रेड-ऑमलेट असो वा सँडविच. तुम्हीही आवडीने ब्रेड खात असाल तर सावध राहा. कारण ब्रेडच्या पाकिटात असं काही सापडलं आहे, जे पाहून तुम्हीही हादरून जाल. एका व्यक्तीने ब्रेडच्या पाकिटाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.
सध्या ऑनलाईन शॉपिंगकडे लोकांचा वाढता कल आहे. कपडे, मोबाईल किंवा इतर वस्तूच नाही तर अगदी किराणा सामानही ऑनलाईन मागवलं जातं. एका व्यक्तीने असंच ऑनलाईन ब्रेड ऑर्डर केला. त्याने फास्ट डिलीव्हरी मागवली. पण त्याला ब्रेडसोबत जे मिळालं ते पाहून जबर धक्का बसला. त्याने याचा व्हिडीओ आणि फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हे वाचा - ऑनलाईन मागवलं Sanitary pad पण मिळालं...; पार्सल उघडताच तरुणीला झटका; असं काय होतं पाहा
नितीन अरोरा असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने त्याच्या @NitinA14261863 ट्विटर हँडलवरून या ब्रेडच्या पाकिटाचा फोटो शेअर केला आहे. नितीनने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्याने 1 फेब्रुवारीला हा ब्रेड ऑनलाईन ऑर्डर केला होता. 10 मिनिटांत डिलीव्हरी मागवली होती. जर 10 मिनिटांत असं काही येत असेल तर मी काही तास थांबणं पसंत करेन, असं तो म्हणाला. तुम्हाला धक्का बसले ब्रेडच्या पाकिटात चक्क एक उंदीर होता. या फोटो, व्हिडीओतही तुम्ही उंदीर पाहू शकता.
ब्रेड पॅकेटमध्ये उंदीर, व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले, कंपनीने काय उत्तर दिले जाणून घ्या त्याने याबाबत कंपनीकडे तक्रारही केली. डिलिव्हरी कंपनीच्या सपोर्ट एक्झिक्युटिव्हसोबत त्याच्या चॅटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. दरम्यान कंपनीने त्याच्या ट्विटला उत्तर देत माफी मागितली.
हे वाचा - कामाची बातमी! ऑनलाइन खरेदी करताना फसवणूक झाल्यास काय करावं? वाचा सोपी प्रोसेस
ब्लिंकिट म्हणालं, याबाबत आम्ही तुमची माफी मागतो. याची दखल घेतली आहे आणि आम्ही त्याची सखोल चौकशी करू. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही अधिक सुरक्षा उपायांचा अवलंब करू. भविष्यात असा अनुभव कुणालाही यावा अशी आमची इच्छा नाही.
Most unpleasant experience with @letsblinkit , where alive rat was delivered inside the bread packet ordered on 1.2.23. This is alarming for all of us. If 10 minutes delivery has such baggage, @blinkitcares I would rather wait for a few hours than take such items.#blinkit #zomato pic.twitter.com/RHNOj6tswA
— Nitin Arora (@NitinA14261863) February 3, 2023
कंपनीने नितीनला त्याचा फोन नंबर आणि ऑर्डर नंबर शेअर करण्यास सांगितले जेणेकरून पुढील तपास करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Online shopping, Viral