मराठी बातम्या /बातम्या /Viral /लेकाला चावला उंदीर, बाबाची पोलिसात धाव; नेमकं प्रकरण काय? VIDEO पाहा

लेकाला चावला उंदीर, बाबाची पोलिसात धाव; नेमकं प्रकरण काय? VIDEO पाहा

उंदीर चावल्याची पोलिसात तक्रार.

उंदीर चावल्याची पोलिसात तक्रार.

उंदीर चावल्याच्या तक्रारीचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hyderabad, India

हैदराबाद, 11 मार्च : तुम्हाला उंदीर चावला तर तुम्ही काय कराल? एक तर त्यावर घरीच काहीतरी उपचार कराल, नंतर डॉक्टरांकडे जाल. पण उंदीर चावल्यानंतर कुणी पोलीस ठाण्यात गेल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका मुलाला उंदीर चावल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलाला उंदीर चावल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे.

तेलंगणाच्या हैदराबादमधील ही विचित्र प्रकरण आहे.  कोमपल्लीतल्या एका प्रसिद्ध फूड कंपनीच्या आऊटलेमध्ये एक मुलगा आपल्या आईवडिलांसह गेला होता. तिथं एक मोठा उंदीर अचानक आला. उंदराने मुलावर उडी मारली आणि त्याला चावला.  ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

पॉवर ऑफ 'आईची चप्पल'! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक मोठा उंदीर वॉशरूममधून येताना दिसतो आहे. ज्या टेबलवर मुलगा आईवडिलांसह बसला आहे, तिथं तो जातो. उंदराला पाहून सर्वजण घाबरतात. तसा उंदीर मुलावर उडी मारतो. मुलाच्या कपड्यांवर तो चढतो आणि त्याला चावा घेतो. मुलाचे वडील आपल्या मुलाच्या अंगावरील उंदराला पळवण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला धरून दूर फेकून देतात.

9 मार्चला घटलेली ही घटना आहे. माहितीनुसार मुलाच्या पायाला उंदीर चावला आहे, त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुलाचे वडील जे एक सैन्य अधिकारी आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

उंदीर चावल्यास काय होतं?

उंदीर चावल्याने अनेक आजार होता.

प्लेग- अतिशय जीवघेणा, संसर्गजन्य असा हा आजार. यात येरेसिनिया स्टेटिस बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. साथीचे रोग पसरवण्यासाठी हा कारण ठरतो.

एचपीसी हेंटा वायरस पल्मॉनरी सिंड्रोम - हा जीवघेणा आजार आहे. उंदराची लाळ, मल, मूत्र यामुळे हा आजार पसरतो.

VIDEO - इवल्याशा उंदराने मिनिटात गिळले 10 गाजर; बकाबका खाल्ल्यानंतर घडलं ते धक्कादायक

रॅट बाइट फीवर- उंदरी चावल्यावर झालेल्या जखमेमुळे सिस्टेमिक बॅक्टेरियल लागण होते. स्ट्रप्टोबॅसिलियस मोनिलिफॉर्ममिस नावाचा बॅक्टेरिया उंदरामार्फत घरात पोहोचतो.

लेप्टोस्पाइरोसिस- हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. ताप, लाल डोळे, पोटदुखी, डायरियापासून काविळीपर्यंत कोणत्याही आजाराला हा कारणीभूत ठरू शकतो.

First published:
top videos

    Tags: Father, Food, Other animal, Parents and child, Police, Police complaint, Rat bit, Son, Viral