मुंबई, 28 फेब्रुवारी : इटुकला पिटुकला उंदीर, एखाद्या पदार्थाचा छोटासा तुकडा पळवून नेताना तुम्ही पाहिलं असेल. पण तो तुकडाही तो तोडून तोडून खातो. पण सध्या सोशल मीडियावर असा उंदीर चर्चेत आला आहे जो चक्क गाजर खातो आहे. आश्चर्य म्हणजे तो गाजर चावत नाही तर तसेच अख्खेच्या अख्खे बकाबका गिळत जातो. त्यानंतर शेवटी जे दिसतं ते त्यापेक्षाही धक्कादायक आहे. गाजर खाणाऱ्या या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या उंदराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पांढऱ्या रंगाचा हा उंदीर त्याने जे केलं ते थक्क करणारं आहे. त्याला पाहून कदाचित गाजर खाणारा ससाही शॉक होईल. कारण हे दृश्यच असं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका टेबलवर गाजर दिसत आहेत. त्याच टेबलवर समोर एक पांढरा उंदीर आहे. तो त्या गाजरांजवळ येतो आणि एक गाजर उचलून तोंडात घालतो. आता हा उंदीर गाजर चावून खाईल असं वाटतं. पण तो ते गाजर चावत नाही तर तोंडात कोंबतो. गाजर तसाच अख्खा गिळतो. आता किमान तो तोंडात गेलेलं गाजर चावले असं वाटतं. पण ते गाजर त्याच्या शरीराच्या एका बाजूला गेलेलं दिसतं. त्यानंतर तो दुसरा गाजर उचलतो आणि तेसुद्धा न चावता तसंच गिळतो. असं एकएक करत तो जवळपास 10 गाजर खातो. VIDEO - छोटा म्हणून चुकूनही याच्याजवळ जाऊ नका; इतका खतरनाक की, चावला तरी समजणार नाही पण मिनिटात जीव जाईल जसे तो गाजर गिळतो तसे ते त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूला साठत जातात. गाजराने त्याचं शरीर फुगतं. तरी तो उंदीर तसा ठिक वाटतो. म्हणजे त्याला तसं काही झाल्याचं तर दिसत नाही. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण झाला असाल. हा उंदीर असा कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंतर हा उंदीर नव्हे तर हॅमस्टर आहे. जो उंदरासारखा दिसतो पण उंदरापेक्षा तो खूप वेगळा आहे. या जीवांमधील संबंध म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मादीशी संबंधानंतर जातो नराचा जीव कारण… तो दिवसभर जमिनीच्या आत बिळात राहतो आणि संध्याकाळच्या वेळेस बिळाबाहेर येतो. आपलं अन्न तो आपल्या तोंडाच्या दोन्ही बाजूला जमा करून ठेवतो आणि नंतर खातो.
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.