शिखा श्रेया, प्रतिनिधी रांची, 9 जून : झारखंडच्या रांची विद्यापीठात अनेकदा असे काही प्रकरण समोर येतात, जे ऐकून धक्का बसतो. पुन्हा एकदा एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. प्रत्यक्षात एक विद्यार्थी परीक्षेला न बसता उत्तीर्ण झाला, मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीचे गुणच गायब आहेत. त्यामुळे तिला आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
हे पीजी प्रादेशिक भाषा विभागातील प्रकरण आहे. रांची विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक आशिष कुमार झा यांनी सांगितलं की, ‘गैरहजर विद्यार्थ्यांचं नाव तुरी गिलुआ असून तो उत्तीर्ण झाला आहे, तर सावित्री बुडिउली या विद्यार्थिनीचे गुण गहाळ झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती मिळवून चौकशी करू. यासोबतच दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, असं ते म्हणाले. मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था सावित्रीच्या अनेक गुणपत्रिकेंचे गुण गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. विभागाच्या नोंदणीनुसार ती पदव्युत्तर परीक्षेच्या चौथ्या सत्राची परीक्षा देत होती. 2014-16 विभागात तिचा रोल नंबर 14MA3002012 होता. तर गिलुआ हा विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होता. 2014-16 विभागात त्याचा रोल नंबर 14MA3002013 आहे. दरम्यान, हा विद्यार्थी सध्या विभागप्रमुख मेरी एस सोरेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहे.