जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था

मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था

गर्भधारणा टाळण्याच्या नादात तरुणीची भयानक अवस्था (फोटो - इन्स्टाग्राम)

गर्भधारणा टाळण्याच्या नादात तरुणीची भयानक अवस्था (फोटो - इन्स्टाग्राम)

गर्भधारणा टाळण्यासाठी उपाय करणाऱ्या या तरुणीची इतकी भयानक अवस्था झाली की ती मृत्यूच्या दारात पोहोचली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 09 जून : मूल नको म्हणून सर्रासपणे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात.  पण प्रेग्नन्सी टाळणाऱ्या या गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम किती भयंकर असू शकतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गर्भनिरोधक गोळ्या घेणारी तरुणी, वयाच्या पंचविशीतच तिची भयानक अवस्था झाली आहे. तिचं नशीब चांगलं म्हणून सुदैवाने ती मरणातून वाचली आहे. तिचा जीव जाता जाता राहिला आहे. यूकेतील ही धक्कादायक घटना आहे. हॉली मॅककोमिश असं या तरुणीचं नाव. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर तिला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं ते तिने शेअर केलं आहे.  एक दिवस थिएटरमध्ये काम करत असताना अचानक तिची दृष्टी गेली. चेहरा अचानक एका बाजूला डोलायला लागला. अर्धांगवायूचा झटका आल्यासारखं वाटलं. आता आपला जीव जातो की काय असंच तिला वाटू लागलं. तिचे सहकारी घाबरले. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात तिलं. तिथं डॉक्टरांनी तिला मिनी स्ट्रोक झाल्याचं सांगितलं. ती घेत असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचा हा परिणाम असल्याचं तिला समजताच तिला मोठा धक्का बसला.

News18लोकमत
News18लोकमत

मिररच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी सांगितलं, गर्भनिरोधक गोळीमुळे तिच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. तिच्या हृदयात छिद्र होतं, त्यामुळे या गुठळ्या मेंदूपर्यंत जात होत्या. वास्तविक याला पेटंट फोरमेन ओव्हल म्हणतात. यामध्ये, हृदयामध्ये एक फ्लॅप-व्हॉल्व्ह उघडतो, जो सामान्यतः जन्मानंतर बंद होतो परंतु काही लोकांमध्ये तो उघडा राहतो. होलीचंही तसंच झालं होतं. बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा…; प्रेग्नन्सी रोखण्यासाठी 8 भयंकर पद्धती मॅककोमिश म्हणाली, गर्भनिरोधक औषध घेण्यापूर्वी मला त्याच्या दुष्परिणामांबद्दल पूर्णपणे माहिती नव्हतं. पण ते घेतल्यानंतर काही आठवड्यांनी मला भयंकर डोकेदुखी होऊ लागली. मला वाटलं की शरीर नवीन संप्रेरकाशी जुळवून घेत असल्याने कदाचित हे सामान्य आहे. पण थिएटरमध्ये जे घडलं ते वेदनादायक होतं. मला काहीच बोलता येत नव्हतं. एक महिला माझ्या नावाने मला हाक मारत होती. पण मी उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते. मला ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक किंवा ‘मिनी स्ट्रोक’ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मला आणखी धक्का बसला. वयाच्या 25 व्या वर्षी हे ऐकणे कुणालाही योग्य नाही. कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध नाही, व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट; कारणही शॉकिंग मी तशी फिट होते, त्यामुळे मला असं काही व्हायला नको होतं. पण डॉक्टरांनी यामागील जे कारण सांगितलं ते ऐकून मी घाबरले. मला रडूच कोसळलं. एखाद्या वाईट स्वप्नासारखं सर्व वाटत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात