अहमदाबाद, 21 ऑक्टोबर : महिलांनी ठरवलं तर त्यांना काहीही अशक्य नाही, हे आतापर्यंत दिसून आलंच आहे. आज कोणत्याच क्षेत्रात महिला मागे नाही. अगदी घरातील काम असो वा बाहेरील काम महिला अगदी उत्तमपणे सांभाळतात. आपलं कौशल्य जगाला दाखवतानाही दिसतात. अशाच काही महिलांचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात महिलांनी तलवारबाजीचं (Woman Sword skill) थरारक असं प्रदर्शन दाखवलं आहे. गुजरातच्या (Gujarat) राजकोटमध्ये (Rajkot) महिलांनी तलवारबाजी (Fencing) केली. राजकोटमध्ये पाच दिवसीय तलवार रास (Talwar Raas) आयोजित करण्यात आलं होतं. यात महिलांनी सहभाग घेतला. त्यावेळी राजपूत महिलांनी जी कसरत करून दाखवली ते पाहून सर्वजण थक्क झाले. महिलेने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली दोन्ही हातात तलवार घेतली आणि तलवार फिरवून दाखवल्या.
#WATCH | Gujarat: Rajput women display their sword skills in Rajkot during an five day event of 'Sword Raas' yesterday pic.twitter.com/ORjbCwOBCp
— ANI (@ANI) October 20, 2021
व्हिडीओत पाहू शकता काही महिला जमिनीवर गुडघे टेकवून बसल्या आहेत. महिलांनी पिरामिड तयार केला आहे. त्यांच्या पाठीवर एक महिला चढली आहे. तिने डोळ्याला पट्टी बांधली आणि दोन्ही हातात तलवार धरल्या आहेत. दोन्ही हातातील तलवार ती वेगाने फिरवताना दिसते आहे. तशीच तलवारबाजी करत ती महिलांच्या पाठीवरून खालीही उतरते. एएनआय न्यूज एजन्सीने ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा - अरे बापरे! झोका देता देता स्वतःही हवेत उडाला तरुण; पाहा VIDEO प्राचीन काळी युद्धा तलवारीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. काही लोक आवड म्हणूनही तलवारबाजी शिकतात. यात महिलाही मागे नाही. राणी जोधा, राणी लक्ष्मीबाई यासुद्धा तलवार चालवायला शिकल्या होत्या आणि आता तर तलवारबाजी म्हणजे महिलांच्या हातातील खेळ बनला आहे. महिला फक्त या कौशल्यात पारंगतच नाही तर विक्रमही करत आहेत. हे वाचा - VIDEO - सन ऑफ सरदार! शीख बांधवांनी पगडीने तरुणाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं 2000 साली जामनगरमध्ये राजपूत महिलांनी तलवारबाजीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही याची नोंद झाली होती.