उटावा, 20 ऑक्टोबर : पगडी (Turban) म्हणजे शीख (Sikh turban) बांधवांची शान, त्यांचा मान. काही झालं तरी शीख लोक आपल्या पगडीला धक्काही लागू देत नाहीत. पण याच पगडीने काही शीख तरुणांनी एका तरुणाचा जीव वाचवला आहे. पगडीचा दोर करून त्यांनी तरुणाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं आहे (Sikh men use turbans to rescue man from waterfall). सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही कडक सॅल्युट कराल.
कॅनडात (Canada) शीख बांधवांनी केलेल्या कामाचं कौतुक होतं आहे. पाच शीख तरुणांनी एका पर्यटकाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आहे. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपली पगडी सोडली. @BCSikhs ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
A video of the incident on Monday, in which five Sikh hikers tied their dastaars (turbans) together to save a man who had slipped and fallen at the Lower Falls at Golden Ears Park. Video courtesy @globalnews
Kudos to these young men on their quick thinking and selflessness. pic.twitter.com/XQuX27OH5i — Sikh Community of BC (@BCSikhs) October 16, 2021
गोल्डन इअर्स प्रां पार्कमध्ये सोमवारी घडलेली ही घटना आहे. व्हिडीओत पाहू शकता हा तरुण डोंगरावरून घसरून पाण्यात बुडणारच होता.
पाण्याचा वेग धडकी भरवणारा आहे. अगदी किनाऱ्याजवळ हा तरुण आहे. कसाबसा तो आपला जीव मुठीत धरून आहे.
त्याला पाहताच पाच शीख तरुण धावत आले. त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या डोक्यावरील पगडी काढली. ती एकमेकांना बांधून त्यांनी त्याचा दोर केला आणि तो पाण्यात बुडणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकला. तरुणाने तो दोर धरला आणि शीख बांधवांनी त्याला खेचत बाहेर आणलं. तर डोंगराच्या वरच्या बाजूने शीख तरुण या तरुणाला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. शेवटी पगडीचा दोर करून त्यांनी त्याला मृत्यूच्या दारातून खेचून काढलंच. या शीख बांधवांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे, त्यांना सलाम केला जातो आहे.
हे वाचा - पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या मदतीसाठी आला गार्ड; मनाला स्पर्शून जाणारा Photo
याआधी भारतातही अशाच एका शीख बांधवाने आपल्या साथीदारासाठी पगडी काढली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत एक शीख जवान जखमी झाला. त्यावेळी दुसऱ्या शीख जवानाने आपली पगडी काढून साथीदाराच्या जखमेवर बांधली. ही घटना स्पेशल डीजीपी आरके विज यांनी ट्विट केली. शीख जवानाच्या हिमतीला सलाम, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos