जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला वाघ; तरुणीला जबड्यात धरून फरफटत नेलं; भयानक LIVE VIDEO

दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला वाघ; तरुणीला जबड्यात धरून फरफटत नेलं; भयानक LIVE VIDEO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जंगलातून रस्त्यावर येत वाघाने तरुणीची केली शिकार, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 01 नोव्हेंबर :  वाघाने शिकार केल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण शक्यतो यामध्ये वाघाला तुम्ही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं आहे. सध्या असा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात वाघ एका माणसाची शिकार करताना दिसला. माणसांची शिकार करताना सिंह कॅमेऱ्यात कैद झालं आहे. भयानक असा हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. जंगलातील वाघ दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला आणि एका तरुणीला जबड्यात धरून फरफटत घेऊन गेला आहे. गाडीबाहेर आलेल्या एका तरुणीवर वाघाने भयंकर हल्ला केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कार उभी आहे. या कारमध्ये बसण्यासाठी एक तरुणी येते. जसा ती कारचा दरवाजा उघडते आणि आत जाते. तसा तिच्यामागून धावत एक वाघ येतो. जो तिच्यावर हल्ला करतो. तिला जबड्यात धरतो आणि फरफटत घेऊन जातो. त्यानंतर कारमधील लोक बाहेर येतात आणि वाघ ज्या दिशेने तरुणीला घेऊन गेला, त्या दिशेने ते लोक धावत जातात. हे वाचा -  फेव्हरेट मिठाईऐवजी कचोरी दिल्याने चवताळली गौरी हत्तीण; दुकानदाराला आधी सोंडेने आपटलं नंतर… यानंतर या तरुणीचं आणि लोकांचं पुढे काय होतं ते या व्हिडीओत दिसत नाही. पण व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

जाहिरात

animals_powers इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये हा बिबट्या असल्याचं म्हटलं आहे. पण पोस्टवरील कमेंटनुसार या व्हिडीओत दिसणारा वाघ आहे. नेटिझन्सनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ जुना आहे. चीनमध्ये घडलेली ही घटना आहे. हे वाचा -  लेकीला चावला खेकडा, रागात वडिलांनी त्याला जिवंतच खाल्लं; झाली भयानक अवस्था हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात