मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्विमिंग पूलमध्ये खेळत होती लहान मुलं; अचानक भलामोठा अजगर पाण्यात आला आणि...; Shocking

स्विमिंग पूलमध्ये खेळत होती लहान मुलं; अचानक भलामोठा अजगर पाण्यात आला आणि...; Shocking

स्विमिंग पूलमध्ये अजगर येताच पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

स्विमिंग पूलमध्ये अजगर येताच पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

स्विमिंग पूलमध्ये अजगर येताच पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 एप्रिल : तुम्ही मोठमोठ्या सापांच्या बऱ्याच फिल्म्स पाहिल्या असतील. ज्यात एखाद्या जंगलात शांत पाण्यात अवाढव्य साप लपून बसलेले असतात. पण कधी कोणत्या स्विमिंग पूलमध्ये असा साप (Python snake video viral) असू शकतो, याचा तुम्ही स्वप्नात तरी विचार केला आहे का? स्विमिंग पूलमधील अशाच एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Python in swimming pool).

आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा दिवसात पाण्यात खेळण्याची मजा काही औरच असते. काही लोक नदीत तर काही लोक स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद लुटतात. लहान मुलांनाही पाण्यात खेळायला सर्वात जास्त मजा येते.  सर्वात जास्त मजा येते. अशीच काही लहान मुलं आपल्या पालकांसह स्विमिंग पूलमध्ये खेळत होती. त्याचवेळी तिथं पाण्यात एक अजगर आला. पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे. हा शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता लहान मुलं स्विमिंग पूलच्या आत पाण्यात आहेत आणि त्यांचे पालक बाहेर आहेत. स्विमिंग पूलमध्ये मुलांसोबत एक पिवळ्या रंगाचा अजगरही दिसतो आहे. आता साधा साप जरी दिसला असता तर कुणीही ओरडत पाण्यातून बाहेर पडलं असतं पण इथं मात्र इतका मोठा अजगर पाण्यात येऊनही कुणाला काहीच वाटलं नाही.

हे वाचा - OMG! ...अन् हवेत लटकली चिमुकली लेक, पाहताच हादरला बाप; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

या अजगराला खरंतर मुद्दामहून पाण्यात सोडलं आहे. मुलं, मोठी माणसं त्याच्यावरून हात फिरवताना, त्याच्याशी खेळताना दिसत आहेत. एकंदर पाहण्यावरून हा अजगर पाळीव असावा असं दिसतं आहे.

@rhmsuwaidi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

हे वाचा - VIDEO - बापरे! शिंगांवर घेऊन गरागरा फिरवलं आणि...; बैलासमोर हिरोगिरी करणं तरुणाच्या अंगलट

अजगराशी बिनधास्तपणे खेळणारी अशा बऱ्याच लहान मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. ज्यांना पाहून आपल्याला धडकी भरते अशा प्राण्यांशी ही मुलं न घाबरता खेळताना दिसतात. पण काही असलं तरी शेवटी तो अजगरच. कधी काय करेल सांगू शकत नाही. त्यामुळे व्हिडीओत पाहून तुम्ही किंवा तुमच्या मुलांना अशा कोणत्याच प्राण्यासोबत खेळायला देऊ नका.

First published:

Tags: Python, Python snake, Snake, Snake video, Viral, Viral videos