मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! ...अन् हवेत लटकली चिमुकली लेक, पाहताच हादरला बाप; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

OMG! ...अन् हवेत लटकली चिमुकली लेक, पाहताच हादरला बाप; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

वडील कामात व्यस्त होते, त्याचवेळी मुलीसोबत असं काही घडलं की वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला.

वडील कामात व्यस्त होते, त्याचवेळी मुलीसोबत असं काही घडलं की वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला.

वडील कामात व्यस्त होते, त्याचवेळी मुलीसोबत असं काही घडलं की वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 एप्रिल : मुलांना सांभाळणं म्हणजे कोणत्याही पालकांसाठी सर्वात मोठं आव्हान असतं. थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी मुल काही ना काही प्रताप करतात किंवा पालकांची एक छोटीशी चूकही मुलांवर भारी पडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात वडिलांच्या एका चुकीमुळे लेक हवेत लटकली आहे. व्हिडीओ पाहून सुरुवातीला धडकी भरते पण नंतर हसूही येतं.

वडील कामात व्यस्त होते. त्यांची आपल्या लेकीकडे पाठ होती (dad busy working daughter hold gate to hang in air) . तेव्हाच अशी घटना घडली की मुलगी हवेत लटकू लागली. वडील तिच्याकडे पाठमोरे होते त्यामुळे त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. तोपर्यंत मुलगी हवेत लटकतच होती  (Girl hang in air holding gate viral video).

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती आणि एक लहान मुलगी घराबाहेर येतात. गेटजवळ ते येतात. मुलगी गेटजवळ जाऊन उभी राहते. व्यक्ती गेटच्या कडेला येते. हा इलेक्ट्रिक गेट आहे. कदाचित गेटमध्ये काहीतरी समस्या असावी म्हणून ही व्यक्ती गेट चेक करत असते. ती गेटजवळ काही तरी करते तसा गेट वर जातो.

हे वाचा - 'पुष्पा...पुष्पराज....अपुन लिखेगा नहीं...', विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक कोमात

त्या गेटला धरून त्याची मुलगी उभी असते. तीसुद्धा गेटसोबत वर जाते. वडील मात्र आपल्या कामात व्यस्त असतो. गेट पूर्ण वर गेल्यानंतर तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. त्याची लेक हवेत लटकत होती.

सुदैवाने गेट फार उंच नव्हता आणि मुलगी गेटला तसंच धरून राहिली तिने भीतीने उडी मारली नाही. त्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही. वडिलांचं लक्ष तिच्याकडे जाताच ते धावत तिच्याकडे गेले आणि तिला उचलून खाली उतरवलं. त्यानंतर ती आपल्या घरात आली.

हे वाचा - चिमुकलीचं Aadhar Card पाहताच शिक्षक हादरले, प्रशासन हैराण; शाळेतही प्रवेश नाकारला

व्हायरल हॉग नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कुणी या मुलीचं कौतुक केलं आहे. तर कुणी वडिलांच्या हलगर्जीपणाबाबत त्यांना सुनावलं आहे.

First published:

Tags: Daughter, Father, Parents and child, Viral, Viral videos