नवी दिल्ली 16 एप्रिल : तुम्ही इंटरनेटवर प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण अजगर आणि बिबट्याच्या लढाईचा व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर बिबट्या आणि अजगराच्या भांडणाचा एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक अजगर बिबट्यावर हल्ला करताना दिसत आहे (Leopard and Python Fight Video). व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
OMG! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 विशालकाय अजगर अन्.., VIDEO पाहून उडेल थरकाप
सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे व्हिडिओ पाहून असं जाणवतं की अजगराला त्या बिबट्याला जिवंत गिळायचं आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. अजगर आणि बिबट्या हे दोघंही त्यांच्या जागी खूप धोकादायक आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत हे दोन्हीही आपली शिकार करतात. अजगर आपल्या भक्ष्याला जिवंत गिळतो, तर बिबट्या आपल्या तीक्ष्ण पंजांनी आणि तीक्ष्ण दातांनी शिकारीला अक्षरशः फाडून टाकतो.
मात्र, जंगलात अजगराची थेट बिबट्याशी टक्कर झाल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या आणि अजगर जंगलात भक्ष्याच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने फिरत आहेत. यादरम्यान दोघे एकमेकांसमोर येतात. बिबट्या काहीही विचार करण्याआधीच अजगर हवेत उडी घेत त्याच्यावर हल्ला करतो. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
विषारी किंग कोब्राला KISS करायला गेला व्यक्ती; पुढे जे घडलं ते पाहून उडले थरकाप, VIDEO
अजगराने बिबट्याला अनेकवेळा गिळण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं, मात्र तो यात यशस्वी होऊ शकला नाही. त्याचवेळी अजगराच्या या हल्ल्यामुळे बिबट्या संतापल्याचं पाहायला मिळतं. यानंतर बिबट्याने अजगराला आपल्याला जबड्यात पकडून तिथून दूर नेलं. व्हिडिओचा शेवट पाहता बिबट्याने अजगराला मारलं असावं असं वाटतं. SDA Wild Animals या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Python, Shocking video viral