मुंबई, 11 जुलै : सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये दोन साप एकमेकांशी भांडत असतील. बरेचदा असे होते की दोघेही भांडून कंटाळतात आणि एकमेकांपासून वेगळे होतात. कधी एक जिंकतो तर दुसरा मरतो. पण ट्विटरवर एका असा फोटो आहे, ज्यामध्ये दोघांची परिस्थीती पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरं तर, हे चित्र दोन सापांमधील भांडणाचे आहे ज्यात दोघांचा शेवट खूप वाईट होतो. शेअर केलेल्या फोटोनुसार, अजगर आणि किंग कोब्रामध्ये जोरदार भांडण झाले आणि दोघांनी एकमेकांना अत्यंत वेदनादायक मृत्यू दिला. अजगराने किंग कोब्राचा गळा दाबून त्याचा श्वास कोंडला, तर कोब्राने अजगराच्या संपूर्ण शरीरात विष टाकले ज्यामुळे दोघांचा भांडून मृत्यू झाला आहे. हा फोटो IFS अधिकारी सुशांत नंदा (@susantananda3) यांनी ट्विटरवर शेअर केले आहे, “अजगरामुळे किंग कोब्राचा गुदमरला, तर कोब्राच्या विषाने अजगर मरतो दोन्ही साप मरण पावले, एकाचा गुदमरून मृत्यू झाला तर दुसरा विषाने मरण पावला. अशा प्रकारे लोक एकमेकांचा नाश करतात. अशा वेडेपणाचा इतिहास साक्षीदार आहे.”
The python suffocated the King Cobra while the king cobra bit it. Both snakes died, one from asphyxiation and the other from the venom.
— Susanta Nanda (@susantananda3) July 7, 2023
And that is how we people destroy each other. History is witness to such madness… pic.twitter.com/mLykX8rvMD
ही बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून 9 हजार लोकांनी लाईक केले आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. फोटो पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्याचबरोबर अधिकाऱ्याच्या वक्तव्याशी अनेकजण सहमत असल्याचे दिसत आहे. काहींनी त्याला विचारले की साप एकमेकांना मारतात का? ज्याच्या उत्तरात अधिकाऱ्याने लिहिले - होय, साप एकमेकांना मारतात. पुढे, अधिकारी म्हणाले की जे साप इतर साप खातात त्यांना ओफिओफॅगस म्हणतात आणि या शब्दाचाच अर्थ साप खाणे असा होतो. किंग कोब्राही अनेकदा इतर सापांना खातात.