मराठी बातम्या /बातम्या /Viral /Vladimir Putin प्राण्यांच्या रक्ताने करतात अंघोळ; अहवालात धक्कादायक खुलासा

Vladimir Putin प्राण्यांच्या रक्ताने करतात अंघोळ; अहवालात धक्कादायक खुलासा

Vladimir Putin

Vladimir Putin

Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रकृतीबाबत नवीन अहवालांमध्ये धक्कादायक दावा करण्यात आला आहे. पुतिन नियमितपणे हरणांच्या शिंगांपासून काढलेल्या 'रक्ताने' आंघोळ करतात, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 5 एप्रिल : गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तरीदेखील दोन्हीही देश माघार घेण्यास तयार नाहीत. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान दोन्ही देशांतील नेत्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) असो की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) दोन्ही नेत्यांबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी (Amazing Facts) समोर आल्या आहेत.

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता तर फारच वाढली आहे. पुतीन यांच्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं असून, अनेकांनी त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील (Personal Life) आश्चर्यकारक गोष्टी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनियन नागरिकांच्या रक्तानं पुतीनं यांचे हात रंगलेले आहेत, अशी प्रतिक्रिया हिंसेच्या विरोधात असलेले लोक देत आहेत. या दरम्यान, पुतीन हे आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातदेखील रक्तानं आंघोळ (Blood Bath) करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुतीन हरणाच्या रक्तानं (Deer Blood) आंघोळ करतात, असं म्हटलं जात आहे.

    म्हणे, 'देशाची फौज वाढवणारी देशभक्त बायको हवी'; बेरोजगार डॉक्टरची Matrimonial Ad Viral

    रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना बहुतेक लोक 'पाषाणहृदयी व्यक्ती' म्हणत आहेत. पुतीन यांची प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा निराळी आहे. अगदी त्यांची आंघोळ करण्याची पद्धतदेखील वेगळी आहे. पुतीन हे हरणांच्या शिंगातून (Deer Antlers) निघालेल्या रक्तानं आंघोळ करतात, असा दावा 'द इंडिपेंडंट'च्या वृत्तात करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, पुतीन हरणांच्या शिंगांच्या अर्कानं आंघोळ करतात. त्यामुळे त्यांची शारीरिक ताकद वाढते. याशिवाय पुतीन प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत कॅन्सर स्पेशालिस्टला (Cancer Specialist) घेऊन जातात, असंही द इंडिपेंडंटनं म्हटलं आहे.

    द इंडिपेंडंटच्या वृत्तात एका सूत्राच्या हवाल्यानं म्हटले आहे की, पुतीन यांनी शारीरीक आरोग्याबाबत अनेक संकटांचा सामना केलेला आहे. असं मानलं जातं की, हरणाच्या शिंगातील रक्त कार्डियोव्हॅस्क्युलर सिस्टिम (Cardiovascular System) आणि त्वचेला पुनरुज्जीवित करतं. त्यामुळे पुतीन आंघोळीसाठी या रक्ताचा वापर करतात. पुतीन यांच्यामुळे रशियामध्ये 'अँटलर बाथ' (Antler Bath) प्रसिद्ध झाला. राष्ट्रपतींशिवाय रशियामध्ये असे अनेक दिग्गज आहेत जे अशा प्रकारची आंघोळ करतात.

    VIDEO - ...अन् 'पुष्पराज'वर तुटून पडल्या संतप्त रणरागिणी; 'पुष्पा'ला झुकवून सर्वांसमोर बदड बदड बदडलं

    रशिया-युक्रेन युद्धामुळे पुतीन सध्या आपल्या तब्येतीबाबत (Health Condition) जरा जास्तच सतर्क आहेत. द इंडिपेंडंटच्या याच अहवालानुसार, पुतीन हे आपल्या प्रत्येक प्रवासात मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमधील (Moscow Central Clinical Hospital) डॉक्टरांना सोबत ठेवत आहेत. डॉक्टरांच्या टीममध्ये कॅन्सर तज्ज्ञ एव्हगेनी सेलिव्हानोव्ह (Cancer specialist Yevgeny Selivanov) यांचाही समावेश आहे. सेलिव्हानोव्ह यांनी पुतीन यांच्यासोबत 35 वेळा प्रवास केला आहे.

    द इंडिपेंडंटनं दिलेल्या बातमीमध्ये खरोखर तथ्य असेल तर, पुतीन यांचे हातच काय तर पूर्ण शरीरच रक्तानं माखलेलं आहे, असं म्हणावं लागेल.

    First published:
    top videos

      Tags: President Vladimir Putin, Russia, Russia's Putin, Vladimir putin