मराठी बातम्या /बातम्या /Viral /म्हणे, 'देशाची फौज वाढवणारी देशभक्त बायको हवी'; बेरोजगार डॉक्टरची Matrimonial Ad Viral

म्हणे, 'देशाची फौज वाढवणारी देशभक्त बायको हवी'; बेरोजगार डॉक्टरची Matrimonial Ad Viral

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

डेटिंस्ट असलेल्या बिहारच्या डॉक्टरची लग्नाची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

पाटणा, 04 एप्रिल : आपल्याला आयुष्याचा पार्टनर कसा हवा त्याची एक छबी प्रत्येकाच्या मनात असते. त्यामुळे लग्नासाठी एखादी मुलगी किंवा मुलगा शोधताना त्यानुसार त्याचा शोध घेतला जातो. काही लग्न ओळखीने जुळतात तर काही लोक आपल्या लग्नासाठी जाहिरात देतात. तशा लग्नाच्या जाहिराती तुमच्यासाठी काही नव्या नाहीत. वृत्तपत्रात अशा मॅट्रिमोनिअल अॅड तुम्ही पाहिल्या असतील (Viral Matrimonial Ad). ज्यात आपली माहिती देऊन लोक आपल्याला कसा वर किंवा कशी वधू अपेक्षित आहे ते सांगतात. अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे (Bizarre Matrimonial Ad).

काही मॅट्रिमोनिअल अॅड इतक्या विचित्र असतात की वाचूनच आश्चर्य वाटतं. लोक अशाही अटी ठेवू शकतं का यावर विश्वासच बसत नाही. अशाच जाहिरातीपैकी ही एक जाहिरात. जी बिहारमधील एका डेटिंस्टने दिली आहे. हा डॉक्टर सध्या बेरोजगार आहे. पण त्याने आपल्या लाइफ पार्टनरसाठी अशा अटी ठेवल्या आहेत की तुम्हालाही चक्कर येईल.

एकतर हा डॉक्टर स्वतः बेरोजगार त्यात त्याला नोकरी करणारी आणि श्रीमंत बायको हवी आहे (Unemployed Man Wants Working Bride). त्यातही हाइट म्हणजे त्याने आपली होणारी बायको देशभक्त असावी अशी अट ठेवली आहे (Man Wants Patriotic Bride).

हे वाचा - VIDEO - ...अन् 'पुष्पराज'वर तुटून पडल्या संतप्त रणरागिणी; 'पुष्पा'ला झुकवून सर्वांसमोर बदड बदड बदडलं

डॉक्टर अभिनव कुमार असं ही जाहिरात देणाऱ्याचं नाव आहे. त्याने जाहिरातीच्या सुरुवातीला थोडक्यात आपली माहिती दिली आहे. आपण बिहारमध्ये राहत असून एक डेंटिस्ट आहे आणि  सध्या आपण बेरोजगार असल्याचं त्याने या जाहिरातीत स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर त्याने आपल्याला कशी नवरी हवी आहे, हे सांगितलं आहे.

जाहिरातीत नमूद केल्यानुसार, "मुलगी गोरी, सुंदर, प्रामाणिक, धाडसी आणि श्रीमंत हवी. मुलांना सांभाळण्यात ती एक्सपर्ट असावी. ती देशभक्त असायला हवी. देशाची फौज आणि स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची इच्छा तिच्यात असावी"

हे वाचा - Corona vaccine घेतल्याने 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

लग्नाची ही जाहिरात पाहून लोक हैराण झाले आहेत. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर बहुतेकांनी संताप व्यक्त केला आहे. लग्नासाठी या अशा अटी ठेवणाऱ्या या डॉक्टरची सर्वांनी शाळा घेतली आहे. सोशल मीडियावर त्याला चांगलंच सुनावलं आहे.

First published:

Tags: Bihar, Marriage, Matrimonial sites, Viral, Wedding