मराठी बातम्या /बातम्या /Viral /बाबो! गाडीएवढी उंचीपण नाही अन् चिमुकल्याने एका चाकावर सुसाट पळवली बाईक; पाहा VIDEO

बाबो! गाडीएवढी उंचीपण नाही अन् चिमुकल्याने एका चाकावर सुसाट पळवली बाईक; पाहा VIDEO

लहान मुलाला अशी ड्रायव्हिंग करताना पाहून तुम्ही थक्कच व्हाल.

लहान मुलाला अशी ड्रायव्हिंग करताना पाहून तुम्ही थक्कच व्हाल.

लहान मुलाला अशी ड्रायव्हिंग करताना पाहून तुम्ही थक्कच व्हाल.

मुंबई, 22 ऑक्टोबर : लहान मुलांना (child) सायकल किंवा छोटी सायकल चालवताना तुम्ही पाहिलं असेल (Child driving video). खऱ्या बाईकवरही लहान मुलं (kids) बसतात पण बाईकचं हँडल धरून ती चालवण्याचं नाटक करतात  (Child driving bike video). लहान मूल म्हटल्यावर त्यांना या सर्व गोष्टींचं आकर्षण असतंच. पण त्यांची ही हौस या वयात प्रत्यक्ष करू देणं शक्यच नाही. पालक त्यांना तसं करूही देत नाहीत. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही एका चिमुकल्याने चक्क बाईक चालवली आहे (Girl driving bike). फक्त बाईक चालवली नाही तर एका चाकावर तिने ती सुसाट पळवली आहे.

बाईक चालवणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. ज्या मुलाची उंचीही बाईकएवढी नाही तो मुलगा बाईक पळवताना दिसली. व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्कल व्हाल. किंबहुना व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण आधीपासून बाईकवर बसलेला आहे. त्याच्यासमोर दुसरा तरुण उभा आहे. तिथं एक लहान मुलगा हेल्मेट घालून येतो. तसा बाईकवरील तरुण खाली उतरतो आणि तो मुलगा बाईकचं हँडल आपल्या दोन्ही हातात धरतो. त्या मुलाची उंची बाईकच्या हँडलला लागते.

हे वाचा - OMG! अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्यानं रस्त्यावर वाऱ्यासारखी पळवली Landcruiser; VIDEO पाहून व्हाल थक्क

इतक्या उंचीच्या मुलाचे बाईकवर चढण्याचेच वांदे असतात. तर हा मुलगा बाईक कसा चालवेल, असंच तुम्हाला वाटेल. पण थांबा पिक्चर अभी बाकी है!

व्हिडीओत पुढे पाहाल तर हा मुलगा बाईक स्टार्ट करतो आणि एका उडीत बाईकवर चढतो. बाईक भुर्रकन पळवतो. थोडं पुढे गेल्यावर ती यू-टर्न घेतो आणि मागे येतो. त्यानंतर तर तो जे करते ते पाहून तर तुम्हाला धडकीच भरेल. हा मुलगा एका चाकावरच बाईक पळवतो. तिथं असलेले तरुणही त्याला प्रोत्साहन देताना दिसतात.

हे वाचा -  पोप फ्रान्सिस यांच्या टोपीवर डोळा; मुलाने भर कार्यक्रमातच काय केलं पाहा VIDEO

खरंतर लहान मुलांना खऱ्या गाड्यांसोबत ड्रायव्हिंग करण्यास मनाई आहे. त्यामुळे आम्ही हा व्हायरल व्हिडीओ दाखवत असलो तरी लहान मुलांनी अशी कोणताही गाडी चालवावी याचं आम्ही समर्थन करत नाही आणि हा व्हिडीओ दाखवून आम्ही प्रोत्साहनही देत नाही आहोत, याची कृपया नोंद घ्यावी. हा एक व्हायरल व्हिडीओ म्हणून आम्ही दाखवत आहोत. होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bike riding, Small child, Viral, Viral videos