नवी दिल्ली 25 एप्रिल : तुरुंगातील परिस्थिती तुम्ही टीव्हीवर पाहिलीच असेल. कधीकधी लोकांना एखाद्याला भेटण्यासाठी किंवा काही दुर्दैवी परिस्थितीत तुरुंगात जावं लागण्याची शक्यता असते. अशात तुरुंगातील जीवन किती कठीण असतं हे तुम्हाला माहीत असेलच. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये दिसणारे हसणारे, गाणारे आणि नाचणारे कैदी हा केवळ भ्रम आहे कारण खऱ्या जीवनात याठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कैद्यांचं आयुष्य काही प्रमाणात सुधारण्यासाठी ब्रिटनच्या तुरुंगाने त्यांना आपल्यासोबत पक्षी ठेवण्याची परवानगी दिली आहे (Prisoners Allowed to keep Birds in Jail).
आईने दिला तिळ्या मुलींना जन्म, तरीही तिसरी बहीण मोठ्या दोघींहून 4 वर्षांनी लहान! कसं घडलं हे?
ब्रिटनमधील ए श्रेणीतील तुरुंगात सर्वाधिक भयंकर गुन्हेगार राहतात. मारेकरी, बलात्कारी, दहशतवादी यांसारखे गुन्हेगार म्हणजे समाजाचं खूप नुकसान करणाऱ्यांना या वर्गात ठेवलं जातं. असे कैदी तुरुंगात कोंबडी, पोपट किंवा इतर विशेष प्रकारचे पक्षी सोबत ठेवू शकतात. जेलबर्ड्स ठेवण्यासाठी राज्यपाल ठरवतात की कोणत्या कैद्यांना पक्षी ठेवण्याची परवानगी दिली जाईल. ज्यांना एखाद्या प्रकारच्या थेरपीची गरज असते, त्यांना जेल पक्षी ठेवण्याची परवानगी देतं.
पक्षी पाळल्याने कैद्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते आणि त्यांना तुरुंगात वेळ घालवणं सोपं जातं, असं प्रशासनाचं मत आहे. त्यामुळे जे कैदी दीर्घकाळ कारागृहात राहतात त्यांना पक्षी दिले जातात. या कैद्यांना सुमारे 500 रुपयांना पक्षी विकले जातात आणि जर त्यांनी त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते त्यांच्याकडून परत घेतले जातात.
गर्ल रूममेटसाठी पठ्ठ्याने केलीये जाहिरात; अटींची यादी पाहून लोकांचा संताप
डेली स्टारच्या वृत्तानुसार, या कैद्यांना एका तुरुंगातून दुसऱ्या कारागृहात पाठवलं तरी ते पक्षी सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. मेलऑनलाईनच्या वृत्तानुसार, यूके तुरुंगात अल-कायदाचा ऑपरेटिव्ह धीरेन बारोट, डेव्हिड बीबर, मुज्जाकर शाह आणि पोलिसांची हत्या करणारा युसूफ जम्मा यांना पक्षी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्याय मंत्रालयाचं म्हणणं आहे की, कैद्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठीच त्यांच्यासोबत पक्षी ठेवले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Prisoners, Viral news