लखनऊ, 09 सप्टेंबर : शाळा म्हणजे विद्येचं मंदिर. जिथं आपण ज्ञान मिळवायला, धडे शिकायला जातो. पण याच विद्येच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडून नाही तर शाळेचा प्रमुख असलेल्या स्कूल प्रिन्सिलपनेच घडवून आणला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतच असं काम करायला लावलं, की पाहूनच सर्वांचा संताप झाला आहे. शाळेतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका सरकारी शाळेतील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना वर्गात बसवणं सोडून टॉयलेटमध्ये उभं केलं आहे. धडे शिकवायचे सोडून त्यांना जबरदस्त टॉयलेट साफ करायला लावलं आहे. व्हिडीओत पाहू शकता काही मुलं शौचायल साफ करताना दिसत आहेत. हे वाचा - बिस्किटांचं आमिष देत अल्पवयीन मुलाला हॉस्पिटलमध्येच करायला लावलं धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO व्हिडीओत एक प्रौढ व्यक्तीही मध्येच दिसते. एका व्यक्तीचा ओरडतानाचा आवाजही ऐकू येत नाही. टॉयलेट नीट साफ केलं नाही तर टॉयलेटमध्येच बंद करेन अशी धमकीसुद्धा ही व्यक्ती या विद्यार्थ्यांना देते. त्यानंतर विद्यार्थी भीतीने टॉयलेट नीट स्वच्छ करू लागतात.
कुणीतरी हा व्हिडीओ लपूनछपून बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. @AhmedKhabeer_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशच्या बल्लियामधील पिपरा काला प्राथमिक शाळेतील ही घटना आहे. हे वाचा - महिलेचा जीव घेणाऱ्या ‘पिटबुल’ने 10 वर्षांच्या चिमुकल्याला बनवली शिकार; कोवळ्या गालाचा लचका तोडला झी न्यूज हिंदी च्या वृत्तानुसार बलियातील प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे. शिक्षण अधिकारी मनीराम सिंह यांनी सांगितलं की, बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाला. सोहवन क्षेत्रातील पिपरा कला प्राथमिक विद्यालायातील हा व्हिडीओ आहे. सोहवन विभागाच्या शिक्षा अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागितला आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधितांविरोधात आवश्यक ती कारवाई केली जाईल.