श्रीनगर, 12 फेब्रुवारी : सोशल मीडिया वापरत नाही, अशा व्यक्ती क्वचितच सापडतील. सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत. आता तर एका बाळाचा जन्मही सोशल मीडियामुळे झाला आहे. सोशल मीडियामुळे बाळाचा जन्म? कसं काय शक्य आहे? वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरं आहे. एका बाळाचा जन्म व्हॉट्सअॅप कॉलमुळे झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील हे प्रकरण आहे.
बहुतेक लोक किमान व्हॉट्सअॅपवर तर आहेत. या व्हॉट्सअॅपने तर कमालच केली आहे. व्हॉट्सअप होतं म्हणून एका बाळाचा जन्म झाला. जम्मू-काश्मीरच्या केरानमध्ये एका महिलेने व्हॉट्सपअॅप कॉलमुळे मुलीला जन्म दिला आहे. केरान प्राथमिक आरोग्य केंद्रात या महिलेची डिलीव्हरी झाली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार क्रालपोरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मीर मोहम्मद शाफी म्हणाले, "शुक्रवारी रात्री केरान प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या प्रेग्नंट महिलेच्या प्रसूतीत समस्या होती. तिला तात्काळ प्रसूतीसाठी सोयीसुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं"
हे वाचा - काहीही! आईवडिलांनी गोंडस बाळाचं ठेवलं असं विचित्र नाव; तुम्हाला वाचतानाही वाटेल लाज
पण हिवाळ्याच्या कालावधीमुळे केरानचा कुपवाडा जिल्ह्याशी संपर्क नव्हता. सर्व रस्ते बंद होते. अशावेळी या महिलेला प्रसूती रुग्णालयात नेण्यासाठी एअरलिफ्ट करणं गरजेचं होतं. पण गुरूवारी आणि शुक्रवारी बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे महिलेला एअरलिफ्ट करणंही शक्य झालं नाही.
शेवटी केरान प्राथमिक आरोग्य केंद्रातच महिलेची प्रसूती करण्याचा वेगळा मार्ग निवडण्यात आला. वरिष्ठ डॉक्टरांनी व्हॉट्सअॅप कॉलवरून सूचना दिल्या तशा इतर डॉक्टरांनी महिलेची डिलीव्हरी केली. तब्बल सहा तासांनंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांन यश मिळालं. एका बाळाचा जन्म झाला.
हे वाचा - OMG! महिलेने दिला अशा बाळाला जन्म, डॉक्टरही शॉक; जन्मताच झाला रेकॉर्ड
एक गोंडस मुलगी. जी पूर्णपणे हेल्दी आहे. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत, असं डॉ. शाफी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Jammu and kashmir, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Small baby, Whatsapp