मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! महिलेने दिला अशा बाळाला जन्म, डॉक्टरही शॉक; जन्मताच झाला रेकॉर्ड

OMG! महिलेने दिला अशा बाळाला जन्म, डॉक्टरही शॉक; जन्मताच झाला रेकॉर्ड

फोटो सौजन्य - फेसबुक

फोटो सौजन्य - फेसबुक

महिलेच्या डिलीव्हरीनंतर बाळाला पाहताच डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

ब्राझिलिया, 21 जानेवारी : सध्या एका बाळाची चर्चा सर्वत्र होते आहे. कारणही तसंच आहे. महिलेने अशा बाळाला जन्म दिला आहे की डॉक्टरही चक्रावले आहेत. बाळ जगात आलं नाही की त्याचा रेकॉर्ड झाला आहे. जन्मताच या बाळाने आधीचा रेकॉर्ड मोडत एक नवा रेकॉर्ड केला आहे. ब्राझीलच्या अॅमेझोनामध्ये जन्मलेल्या या बाळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

क्लिडिन सँटोस नावाची महिला, प्रेग्नंट होती. रूटिन प्रेग्नन्सी टेस्टसाठी ती रुग्णालयात गेली. तिथं तिच्या तपासण्या केल्यानंतर तिचं सिझेरियन करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांना दिसून आलं. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच 18 जानेवारीला या महिलेची सिझेरियन डिलीव्हरी झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. पॅरिंटिन्समधील पॅड्रे कोलंबो हॉस्पिटलमध्ये या महिलेची डिलीव्हरी झाली.

हे वाचा - Shocking! अख्खं कुटुंब अज्ञात आजाराच्या विळख्यात, एकाचा मृत्यू; आठही सदस्यांची भयंकर अवस्था पाहून डॉक्टरही शॉक

पण हे बाळ साधंसुधं नव्हतं तर खूप खास होतं. त्याला पाहून डॉक्टरही चक्रावले. त्यांनी त्याला सुपरसाइझ बेबी असं म्हटलं आहे. कारण ते बाळ आहेच तसं. वजनदार आणि भारी उंचीचं. हो... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तब्बल 7 किलो वजन आणि 2 फिट लांबीचं हे बाळ. तो इतका मोठा आहे की त्याच्या पालकांनी त्याच्यासाठी घेतलेले कपडेही त्याला होत नव्हते.

द सनच्या वृत्तानुसार राज्यात आतापर्यंत जन्माला आलेलं हे सर्वात वजनदार बाळ आहे. याआधी 2014 साली 6.74 बाळ जन्मलं होतं. पेड्रो अॅल्युझिओ असं त्याचं नाव. त्याची उंची 57 सेमी होती. म्हणजे या बाळाने तो रेकॉर्ड मोडला आहे आणि आता नवा रेकॉर्ड केला आहे.   डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नवजात बाळ आणि त्याची आई पूर्णपणे ठिक आहे. बाळाचं नाव एंगर्सन असं ठेवण्यात आलं आहे.

हे वाचा - 'महिलांना जितकी जास्त मुलं, तितका जास्त पगार, 3 लाख रुपयांचं अनुदान', मुख्यमंत्र्यांची अजब घोषणा

जगातील सर्वात वजनदार बाळाचा विचार करता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार आतापर्यंत जगातील सर्वात वजनदार बाळ 1955 साली इटलीमध्ये जन्माला आलं होतं. त्याचं वजन 10.2 किलो होतं.

आता एंगर्सनला डॉक्टरांनी सुपरसाइझ बेबी म्हटलं आहे. अशा बाळांना पाहिल्यानंतर कुणी त्याला वजनदार, कुणी बाहुबली म्हणेल. तुम्ही या बाळाला काय म्हणाल ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्सममध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Small baby, Viral, Weight