मराठी बातम्या /बातम्या /Viral /काहीही! आईवडिलांनी गोंडस बाळाचं ठेवलं असं विचित्र नाव; तुम्हाला वाचतानाही वाटेल लाज

काहीही! आईवडिलांनी गोंडस बाळाचं ठेवलं असं विचित्र नाव; तुम्हाला वाचतानाही वाटेल लाज

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पालकांनी बाळाचं इतकं विचित्र नाव ठेवलं आहे की त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 09 फेब्रुवारी : बाळाची चाहूल लागताच ते आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्या नावाची तयारी सुरू होते. मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झाली तर हे नाव अशी नावांची यादीच तयार असते. नावात काय आहे, असं म्हणतात. पण खरंतर नावातच सर्वकाही असतं हे नंतर समजतंच. अशाच एका बाळाचं नाव  सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या बाळाच्या पालकांनी त्याचं नाव इतकं विचित्र ठेवलं आहे की तुम्हाला वाचायलाही लाज वाटेल.

आपल्या बाळाचं नाव सर्वांपेक्षा वेगळं, हटके असावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. पण काही वेळा काहीतरी युनिक नाव ठेवण्याच्या नादात काहीही नाव ठेवलं जातं. अशाच एका दाम्पत्याने आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचं नावही सर्वांना सांगितलं आहे. सोशल मीडिया रेडिटवर ही पोस्ट करण्यात आली आहे.

हे वाचा - Trans couple baby born : अखेर 'त्या' प्रेग्नंट पुरुषाने दिला बाळाला जन्म; ट्रान्सकपलने शेअर केला PHOTO

बाळाचं नाव वाचून सर्वजण हैराण झाले आहेत. काहींनी या नावाची खिल्ली उडवत इतिहासातील सर्वात वाईट, हास्यास्पद नाव म्हटलं आहे. तर काहींनी इतके क्रूर आईवडील कधी पाहिले नाहीत असं म्हणत पालकांवर संताप व्यक्त केला आहे. आता इतिहासातील सर्वात वाईट आणि पालकांना क्रूर ठरवणारे बाळाचं हे नाव नेमकं आहे तरी काय? तुम्हालाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.

तुम्ही पोस्टमध्ये पाहाल तर गोंडस बाळाचा फोटो दिसतो. याच फोटोखाली या गोंडस बाळाचं नाव मात्र तितकंच विचित्र आहे. तुम्ही स्पेलिंग वाचली तर Pheart  असं हे नाव आहे. वाचताच त्याचा उच्चार फार्ट असाच येतो. काहींनी याचा उच्चार फर्ट असा केला आहे.

हे वाचा - OMG! महिलेने दिला अशा बाळाला जन्म, डॉक्टरही शॉक; जन्मताच झाला रेकॉर्ड

u/isocleat  रेडिट अकाऊंटवरील ही पोस्ट आहे. बाळाचं असं नाव वाचताच त्यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान काहींनी पालकांची पहिली भाषा इंग्रजी नसावी असाही अंदाज व्यक्त केला आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटतं किंवा अशी काही विचित्र नावं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Small baby, Viral