मुंबई 4 ऑगस्ट : सोशल मीडियावर कोणाला कधी आणि कशी प्रसिद्धी मिळेल हे काही सांगू शकत नाही. खरंतर सोशल मीडियामुळे अनेक लोकांचं नशीब बदललं आहे. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडीओमधील मुलांने आपल्या आवाजाने आणि आपल्या कामामुळे सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तुम्ही बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणावरुन प्रवास करताना पाहिलं असेल की, तेथे अनेक असे लोक येतात जे गाणं गातात आणि पैसे गोळा करतात. परंतू या व्हायरल व्हिडीओमधील मुलाचा हेतू पैसे गोळा करणं नव्हता. या व्हिडीओमधील हा गाणारा मुलगा आणि त्याचा मित्र रस्त्याच्या कडेला उभं राहून गिटारच्या सह्याने तेरी ‘मीट्टी मे मिलजावा’ हे गाणं गायलं. या मुलाचा आवाज खरोखरंच खूप गोड आहे. ज्यामुळे त्याचं हे गाणं ऐकायला लोक देखील गोळा झाले. आपल्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेल्या जयेशचं बदललं आयुष्य, Video Viral झाल्यानंतर अशी आहे परिस्थिती ज्यानंतर एक तरुणी या लहान मुलाला पैसे देण्यासाठी पुढे आली, परंतू त्यांनी हे पैसे घेतले नाही. खरंतर हा मुलगा आपल्याकडे असलेल्या टॅलेंटचा वापर पैसे मिळवण्यासाठी नाही, तर लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि स्वत:ला आनंद मिळावं म्हणून गात होता.
गरबी आणि पैशांची गरज भासून सुद्धा आपल्या जवळ असलेल्या टॅलेंचा वापर पैशे मागण्यासाठी न करणं ही खरोखरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हातारे काका रस्त्यावरच झाले Romantic, काकूंनी दिली अशी प्रतिक्रिया… Video Viral या मुलाच्या आवाजाने तर आधीच लोकांचं मन जिंकलं, पण या मुलाच्या या वागण्याने देखील सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. ज्यामुळेच हा व्हिडीओ लोकांकडून जास्त पसंत केला जात आहे. त्यमुळे तो सोशल मीडियावर देखील ट्रेंड होत आहे.