मुंबई 25 सप्टेंबर 2022 : सोशल मीडियावर एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील मुलाचं गाणं हे अंगावर काटा आणणारं होतं. या लहानग्या मुलाने चंद्रा हे ट्रेंडिंग गाणं गायलं आहे, ते ही आपल्या गावरान टचसह. आधीच चंद्राच्या डान्सने सर्वांना वेड लावलं होतं, पण आता या मुलाच्या गाण्यानं आणि आवाजानं सगळ्यांना वेड लावलं आहे. या शाळकरी मुलाचं नाव जयेश खरे आहे, या सहावीच्या मुलाच्या आवाजात अशी काही जादू आहे की तुम्ही त्याचं गाणं संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. जयेश हा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. जयेशच्या वडीलांच्या सांगण्यानुसार त्याने नुकतेच गायनाचे क्लासेस लावले आहेत. हे पाहा : ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल या व्हिडीओनंतर जयेशचं आयुष्य बदलून गेलं आहे. छोट्याशा गावात राहणाऱ्या जयेशला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला आहे. जयेशचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याची मुलाखत घेतली, तर घरातील आणि गावाकडची मंडळी तर त्याला आता स्टार मानू लागले आहेत. जयेशच्या बाबांना जेव्हा या बदललेल्या परिस्थीतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, ‘‘सगळ्यांना खूपच छान वाटतंय, जयेशला भेटण्यासाठी अनेक मंडळी आली, ज्यांनी त्याचं कौतुक देखील केलं. तसेच कामीनी आडव आणि मेघना भालेराव अशा संगीताच्या शिक्षकांनी जयेशला ऑनलाईन शिकवू असं आश्वासन दिलं आहे. ज्यामुळे संपूर्ण कुटूंब सध्या खूपच आनंदी आहे.’’ पाहा जयेश खरेचा व्हायरल झालेला तो व्हिडीओ
शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्खा महाराष्ट्राला लावलंय वेड, पाहा व्हायरल व्हिडीओ#viralvideo #trending #maharastra pic.twitter.com/tT3aKFxOly
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
अनेक दिवस उलटले तरी, जयेशच्या गाण्याचं वेड लोकांना आजही आहे, अनेक लोक जयेशच्या या व्हायरल व्हिडीओला भरभरुन लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. पण खरंच घरची परिस्थीती आणि कमी संसाधनात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या या मुलाच्या टॅलेंटला मानावं लागेल. हे पाहा : एवढ्याशा चिमुकल्याने शिक्षिकेलाच दिली इतकी खतरनाक धमकी की…; VIDEO पाहून नेटिझन्सही घाबरले ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थामधील हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो लोकांना फारच आवडला.