आदित्य कुमार/लखनऊ, 23 मार्च : सध्या कितीतरी बाबा चर्चेत आहेत, जे चमत्कार करत असल्याचा दावा करतात. पण या चमत्कारिक बाबांपेक्षा खूप वेगळे असलेले बाबा ते म्हणजे पीपल बाबा. ज्यांनी जिथं पाय ठेवला तिथं हिरवळ आली. त्यांच्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल 2 कोटी झाडं उगवली आहेत. अशा या पीपल बाबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
उत्तर प्रदेशच्या नोएडातील हे पीपल बाबा, ज्यांचा जन्म 1966 साली झाला. त्यांचं खरं नाव स्वामी प्रेम परिवर्तन आहे. पण त्यांचं काम पाहता लोक त्यांना पीपल बाबा बोलतात आणि आता याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. गेल्या 4 दशकांत त्यांनी 2 कोटी झाडं लावली ज्यात सर्वाधिक पिंपळाची झाडं आहेत. त्यामुळेच त्यांना पीपल बाबा म्हटलं जातं. ते पर्यावरणप्रेमी आहेत.
Killer Tree : फक्त स्पर्श केला तरी होतो मृत्यू; चुकूनही या सुंदर झाडाच्या जवळ जाऊ नका
पीपल बाबा दहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पिंपळाचं झाड लावलं. शिक्षकांपासून त्यांना झाडं लावण्याची प्रेरणा मिळाली. पिंपळाचं झाड स्वतःसह कित्येक झाडांना आणि जीवांना जिवंत ठेवतं. याची फार देखभाल करावी लागत नाही. त्यामुळे त्यांनी पिंपळाचं झाड लावायला सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "माझे वडील आर्मीत होते. दर दोन वर्षांनी त्यांचं ट्रान्सफर व्हायचं. त्यामुळे माझं शिक्षणही वेगवेगळ्या राज्यात झालं. बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात माझं शिक्षण झालं. वेगवेगळ्या जिल्ह्यात राहून मी काम केलं. आम्ही गिव्ह मी ट्री फाऊंडेशन तयार केली. त्या माध्यमातून आतापर्यंत 28 राज्यांतील 202 जिल्ह्यांत झाडं लावली, जंगलं निर्माण केली. असे एकूण 2 कोटी झाडं आम्ही स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लावले"
आश्चर्य! छोट्याशा बाटलीतील पाण्याचा चमत्कार; कॅन्सरसह अनेक आजारांचे रुग्ण ठणठणीत झाल्याचा दावा
संपूर्ण जगभरात प्रदूषणाची जी स्थिती आहे, ती सुधारण्यासाठी आपल्याला जंगल आणि मानवी वस्ती यांचं प्रमाण 50-50 ठेवायला हवं, असं ते सांगतात.
जर तुम्हालाही आमच्यासोबत सहभागी व्हायचं असेल, आमच्यापैकी कुणाशी संपर्क साधायचा असेल तर www.peepalbaba.org या वेबसाईटला भेट द्या, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Tree, Tree plantation, Uttar pradesh