मराठी बातम्या /बातम्या /Viral /फॉर्च्यूनरच्या नंबर प्लेटवर ते नाव लिहिणं भोवलं; पोलिसांनी 28 हजार दंड घेत गाडीही केली जप्त

फॉर्च्यूनरच्या नंबर प्लेटवर ते नाव लिहिणं भोवलं; पोलिसांनी 28 हजार दंड घेत गाडीही केली जप्त

पोलिसांनी जेव्हा या फॉर्च्यूनरच्या मालकाला थांबवलं, तेव्हा तो पोलिसांसोबतच वाद घालू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला 28 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच गाडीही जप्त केली.

पोलिसांनी जेव्हा या फॉर्च्यूनरच्या मालकाला थांबवलं, तेव्हा तो पोलिसांसोबतच वाद घालू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला 28 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच गाडीही जप्त केली.

पोलिसांनी जेव्हा या फॉर्च्यूनरच्या मालकाला थांबवलं, तेव्हा तो पोलिसांसोबतच वाद घालू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला 28 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच गाडीही जप्त केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ 18 जानेवारी : आपल्या गाडीसाठी फॅन्सी नंबरप्लेट वापरण्याची आणि त्यावर काहीतरी हटके लिहिण्याची हौस बऱ्याच जणांना असते. मात्र हीच हौस किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील आहे. ज्यात फॉर्च्यूनर गाडीच्या मालकाला नंबरप्लेटवर नको ते लिहिणं चांगलंच महागात पडलं. फॉर्च्यूनरच्या मालकाने नंबर प्लेटवर गाडीच्या नंबरऐवजी ठाकूर लिहिलं होतं. यासोबतच फॉर्च्यूनरच्या पुढे पोलीसही लिहिलं होतं.

Ajab gajab : पॅकेटवरचा पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कन्फ्यूज; सोशल मीडियावर फोटोची चर्चा

पोलिसांनी जेव्हा या फॉर्च्यूनरच्या मालकाला थांबवलं, तेव्हा तो पोलिसांसोबतच वाद घालू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला 28 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच गाडीही जप्त केली. या गाडीवर नंबरच्या जागी ठाकूर लिहिलेलं होतं. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच याकडे लक्ष देत चेकिंगदरम्यान ही गाडी अडवली.

यानंतर फॉर्च्यूनरमधील व्यक्ती पोलिसांसोबतच वाद घालू लागला. यामुळे पोलिसांनी लगेचच ही गाडी ताब्यात घेतली. अद्याप हे समजू शकलेलं नाही की ही गाडी नेमकी कोणाची होती. मात्र, नंबर प्लेटच्या जागी नंबरऐवजी ठाकूर लिहिणं आणि पोलिसांसोबत वाद घालणं चालकाला भलतंच महागात पडलं आहे.

Google Search करुन मिळवलेली माहिती अशी ठरु शकते धोकादायक

अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण नाही. दररोज अशी अनेक प्रकरणं पाहायला किंवा ऐकायला मिळतात, ज्यात लोक आपल्या कारच्या किंवा दुचाकीच्या नंबरच्या जागी आपली जात किंवा पद लिहिण्याचा प्रयत्न करतात. पोलीस अशा कार आणि बाईकवर लगेचच अॅक्शनही घेतात. त्यांच्याकडून दंडही आकारला जातो. मात्र तरीही लोक या गोष्टी थांबवत नाहीत

First published:

Tags: Car, Traffic Rules