2019 साली या अंड्याचा फोटो World_record_egg इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. 3 वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोने एक वेगळाच रेकॉर्ड बनवला आहे. त्यावेळी सर्वाधिक लाइक मिळालेल्या काइली जेनरच्या फोटोलाही लाइक्सच्या बाबतीत मागे टाकलं आहे. आतापर्यंत या फोटो 55.5 दशलक्ष लाइक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्या अकाऊंटवर फक्त हा एकच फोटो आहे. त्याच्याआधी आणि त्याच्यानंतर दुसरा कोणताच फोटो पोस्ट करण्यात आलेला नाही. हे वाचा - Viral होतोय सर्वात महागड्या मिठाईचा VIDEO, किंमत ऐकूनच भरेल पोट! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी या अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला त्यावेळी काइली जेनरच्या फोटोला सर्वात जास्त लाइक होते. काइली जेनरच्या पोस्टला मागे टाकण्यासाठी या अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या अंड्याला जास्तीत जास्त लाइक्स करावे, असं आवाहनही नेटिझन्सना करण्यात आलं होतं. त्यानंतर अंड्याच्या फोटोला लाइक करण्याची जणू मोहीमच सुरू झाली. आता इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाइक मिळालेला हा फोटो आहे.The World Record Egg was posted three years ago today and is STILL the most liked picture on Instagram with 55.5 million likes!https://t.co/iUBaYADG08
— Guinness World Records (@GWR) January 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Record, Social media, Viral