जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - रस्त्यात समोर होता मृत्यू! यमराजाआधी देवदूत बनून आला पोलीस; वाचवला शेतकऱ्याचा जीव

VIDEO - रस्त्यात समोर होता मृत्यू! यमराजाआधी देवदूत बनून आला पोलीस; वाचवला शेतकऱ्याचा जीव

पोलिसाने वाचवला शेतकऱ्याचा जीव.

पोलिसाने वाचवला शेतकऱ्याचा जीव.

शेतकरी रस्त्यावर अचानक कोसळला आणि त्याचक्षणी पोलिसाने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

हैदराबाद, 20 ऑक्टोबर : मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. एक शेतकरी असाच चालता चालता मृत्यूच्या दारात पोहोचला. रस्त्याच समोर अगदी यमराज शेतकऱ्याचे प्राण हिरावण्यासाठी उभाच होता. पण यमराज या शेतकऱ्याजवळ पोहोचण्याआधीच पोलीस देवदूत बनून शेतकऱ्यासाठी धावून आला. त्याने शेतकऱ्याचा जीव वाचवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस. ज्यांनी आपला जीव धोक्यात टाकून, आपल्या जीवाची बाजू लावून कित्येक नागरिकांचा जीव वाचवला आहे. असे किती तरी व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. आंध्र प्रदेशमधील अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका पदयात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा एका पोलिसाने जीव वाचवला आहे. हे वाचा -  धक्कादायक! बोलता बोलता मृत्यूने गाठलं, Gym Trainer ने खुर्चीतच सोडला जीव; Shocking Video महा पदयात्रेत सहभागी झालेला एक  शेतकरी अचानक रस्त्यात कोसळला. गॅमन ब्रीजवर तो पडला. त्याच्या आजूबाजूला बरेच शेतकरी होते, तेसुद्धा घाबरले. एकच खळबळ उडाली. अखेर एक पोलीस धावत तिथं आला. पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसाने शेतकऱ्याच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवून दाब द्यायला सुरुवात केली. याला सीपीआर असं म्हटलं जातं. हार्ट अटॅक आल्यानंतर तात्काळ आणि प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर दिला जातो. ज्यामुळे श्वासोच्छवास पूर्ववत होण्यास किंवा सुरू राहण्यास मदत होते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पोलीस कशापद्धतीने शेतकऱ्याला सीपीआर देतो आहे. हे वाचा -  Shocking! ‘चौघंही मरणार’, म्हणताच चारही मित्रांना तिथंच काळाने गाठलं; पाहा मृत्यूचा LIVE VIDEO त्यानंतर या शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात

आंध्र प्रदेश पोलिसांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोलिसाचं नाव रहमेंद्रवर्म आहे. पोलीस महासंचालक केव्ही राजेंद्रनाथ रेड्डी यांनीही या पोलिसाचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात