लखनऊ, 19 ऑक्टोबर : मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच एका जिम ट्रेनरचा बोलता बोलता जीव गेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच त्याला मृत्यूने गाठलं आहे. त्याचा मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेश च्या गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना आहे. जिममध्ये हार्ट अटॅक आल्याच्या, मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच घटनांपैकी हा एक व्हिडीओ. गाझियाबादमधील एका जिम ट्रेनरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. खुर्चीत बसलेला असताना बोलताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे. हे वाचा - Heart attack चा इतका मोठा झटका; पन्नाशी गाठलेला ‘तो’ 25 वर्षांचा तरुण दिसू लागला माहितीनुसार या जिम ट्रेनरला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. पण त्याने जिममध्ये जाणं थांबवलं नव्हतं, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.
या व्हिडीओत हा ट्रेनर खुर्चीतच बसलेला दिसतो आहे. पण जिममध्ये एक्सरसाइझ करताना हार्ट अटॅक आल्याची बरीच प्रकरणं घडली आहेत. जिम करताना काही चुका यासाठी कारणीभूत ठरतात.
Ghaziabad: A gym trainer died of a heart attack as he was sitting on a chair. The incident took place in Ghaziabad. The video is here. In the past, there were several instances that happened in different parts of the country. #heart pic.twitter.com/CwuiN8tsAJ
— Tanseem Haider तनसीम हैदर Aajtak (@TanseemHaider) October 19, 2022
जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची कारणे नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल मधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, अनेक वेळा जीममुळे आपल्या हृदयाच्या ईसीजीमध्ये बदल होतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येतो. काही लोक कमी वेळात उत्तम शरीर बनवायचे असेल तर सप्लिमेंट्स घेऊन जिम करतात. सप्लिमेंट घेतल्यानंतर जीम केल्याने हृदयाचे ठोके अबनॉर्मल होतात. यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. डॉ. वनिता अरोरा सांगतात की, सर्व लोकांनी जिममध्ये जाण्यापूर्वी कार्डियाक कन्सल्टंट करणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक 30 किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी वेट लिफ्टिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, ट्रेडमिल करण्यापूर्वी कार्डिओलॉजिस्टला नक्कीच भेटावे. पटकन शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवणे देखील योग्य नाही. व्यायाम एका मर्यादेत करावा. जिम देखील पात्र प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावी, जेणेकरून समस्या टाळता येतील. हे वाचा - या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना? डॉ. वनिता अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लोकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही. उद्यानात जाऊन 40 मिनिटांत 4 किमी चालून ते तंदुरुस्त राहू शकतात. मात्र, ज्यांना व्यायामशाळेत जायचे आहे, त्यांनी प्रथम हृदयरोगतज्ज्ञांशी बोलावे. ट्रेडमिलवर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका. वेट ट्रेनिंग करू नये. जर तुम्हाला एरोबिक्स करायचे असेल तर थोडा वेळ करा.