लखनऊ, 18 ऑक्टोबर : मला मरण का येत नाही, आता मी मरणार… मृत्यू बाबत असं कधी ना कधी आपल्या तोंडून नकळत किंवा आवेशात निघून जातं. पण तोंडातून निघालेला हा शब्द काही वेळा खराही ठरू शकतो, असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गाडीने प्रवास कऱणाऱ्या मित्रांपैकी एकाने आता आपण सर्वजण मरणार असं म्हटलं आणि त्याच्या काही क्षणातच त्यांना मृत्यूने गाठलं. मृत्यूचा हा थरारक व्हिडीओही व्हायरल होतो आहे. तोंडातून मृत्यूबाबत भविष्यवाणी निघते काय आणि ती लगेच खरी ठरते काय. उत्तर प्रदेशमधील हे हादरवणारं प्रकरण. चार मित्र गाडीतून प्रवास करत होते. गाडीही साधीसुधी नाही. महागडी, आलिशान आणि सुरक्षित अशी बीएमडब्ल्यू कार. याच गाडीच्या अपघातात या चौघांचा मृत्यू झाला आहे. यूपीच्या पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर गेल्या शुक्रवारी हा अपघात झाला. मृत्यूआधी या मित्रांनी लाइव्ह व्हिडीओ बनवला होता. हे वाचा - गाडीचे तुकडे-तुकडे, तर ड्रायव्हर हवेत… टोलनाक्यावरील थरारक Video अंगावर काटा आणणारा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ताशी 200 किमी वेगाने की कार चालते आहे. गाडी चालवणाऱ्या मित्राला इतर मित्र गाडी आणखी वेगाने चालवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. जसे मित्र मोठमोठ्याने ओरडत आहे. तसा गाडीचा स्पीड अधिक वाढत होता. त्यापैकी एक जण मात्र घाबरला. त्याला समोर मृत्यू दिस होता. आज आपण सर्वजण मरणार, असं तो म्हणाला आणि त्याने मृत्यूबाबत त्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. काही वेळाने कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकला कार धडकली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार अपघात झाला तेव्हा बिहारच्या रोहतसच्या एका खासगी मेडिकल क़लेजमध्ये प्रोफेसर असलेले ३५ वर्षांचे डॉ. आनंद प्रकाश ही गाडी चालवत होते. गाडीत त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मित्र व्हिडीओ बनवत होता. हे वाचा - वाचवा…वाचवा… वाचवा… पुणेकर तरुणाची बसमध्ये बोंबाबोंब; त्याच्यासोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO दरम्यान ज्या ट्रकला ही कार धडकली त्या ट्रकचा ड्रायव्हर फरार आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.