कामगारांना सरकारकडून आणि वेगवेगळ्या स्तरातून रेशन अत्यावश्यक सेवा पुरवून मदतीचा हात दिला जात आहे. यामध्येच त्यापलिकडे मन अस्वस्थ करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुरुग्राम, 23 एप्रिल : देशात कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन करावं लागलं आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय, कंपन्यांची कामं सध्या बंद आहेत. कामगार आणि पोटावर हात असलेल्या नागरिकांना, कामगारांना सरकारकडून आणि वेगवेगळ्या स्तरातून रेशन अत्यावश्यक सेवा पुरवून मदतीचा हात दिला जात आहे. यामध्येच त्यापलिकडे मन अस्वस्थ करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. BSNL कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणाला दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं काय खायचं हा प्रश्न आहे. पोट भरण्यासाठी हातात पैसे नाहीत आणि रोज फक्त पाण्यावर राहून ड्युटी करण्यासाठी ताकद येत नाही. खिशार रुपया नाही तर खाणार काय? असा प्रश्न होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकानं शेवटी गवत पाण्यासोबत चावून खाल्ल्याचा धक्कादायक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा-धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि...
BSNL कार्यालयाबाहेर हा तरुण नोकरी करत आहे. सुरक्षा सरक्ष म्हणून ज्या कंपनीनं त्याला ही नोकरी दिली त्या ठेकेदारानं मात्र दोन महिन्यांचा पगार दिला नाही. आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण तेथून नोकरी सोडल्यानंतर त्याने बीएसएनएल कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्यास सुरवात केली. परंतु सुरक्षा कंपनीने दोन महिन्यांपासून एक रुपयादेखील दिला नाही, त्यामुळे नाराज झाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
BSNL कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी जेव्हा पगाराची मागणी केली तेव्हा ठेकेदारानं पगार देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप रक्षकानं केला आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आहे. या संकटाविरोधात लढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. गरजूंना आणि कामगारांना प्रशासनाकडून आणि काही समाजसेवी संस्थांकडून अन्नदान केलं जात असताना दुसरीकडे मात्र ही भयानक अवस्था आहे.
हे वाचा-मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.