व्हर्जिनिया, 29 एप्रिल : कोरोनामुळे सध्या जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जवळजवळ महिन्याभरापासून लोकं घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत काही लोकं नवीन कला शिकत आहेत, तर काही मास्टरशेफ झाले आहे. मात्र एका मुलीनं केलेली मस्करी तिच्या घरच्यांसह तिच्या जीवावर बेतली. अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील एक मुलगी खेळता खेळता वॉशिंग मशिनमध्ये जाऊन लपली. अमारी डेन्सी असे या मुलीचे नाव असून. 18 वर्षाची अमारी खेळता खेळता वॉशिंग मशिनमध्ये जाऊन लपली. मात्र तिला बाहेर पडता येत नव्हते. वॉशिंग मशिनमध्ये अडकल्यानंतर तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. घरच्यांनी प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांनी प्रिन्स विल्यम काउंटी फायल या बचाव दलाला बोलवलं. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत डेन्सीला बाहेर काढले. वाचा- पगार न मिळाल्याने भूक भागवण्यासाठी security गार्ड खातोय गवत डेन्सीने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित, “मला खूप काळजी वाटत होती. मला माहित नव्हते, मी यातून बाहेर पडेन की नाही. लोकं मला वाचवू शकतील का? पण बचाव पथकाने मला वाचवले. हा अतिशय भयानक अनुभव होता”, असे सांगितले. वाचा- बंद हॉटेलमध्ये बसला लपून, 4 दिवसात संपवल्या 70 दारूच्या बाटल्या
वाचा- लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय या अनुभवानंतर शेजारचेही घाबरले आहेत. तर, काहींनी मुलांसोबत पालकांनी खेळले पाहिजे, असा सल्ला दिला.

)







