जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मंडपातील हाणामारी पाहून लग्नातून पंडितच फरार; शेवटच्या क्षणी पोलिसांनी केलं चकित करणारं काम

मंडपातील हाणामारी पाहून लग्नातून पंडितच फरार; शेवटच्या क्षणी पोलिसांनी केलं चकित करणारं काम

पोलिसांनी पूर्ण केले लग्नाचे विधी

पोलिसांनी पूर्ण केले लग्नाचे विधी

दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर हा गोंधळ पाहून पंडितासह सर्व वरातीतील लोकही पळून गेले. दरम्यान, वधूकडील लोकांनी डायल 112 वर मदतीची याचना केली.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 24 जून : अनेकदा लग्नाच्या मंडपात अशा काही घटना घडतात, ज्याची चर्चा सगळीकडे रंगते. आता अशाच आणखी एका अनोख्या लग्नाचं प्रकरण उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगरमधून समोर आली आहे. या लग्नात चक्क पोलिसांनी पंडिताची भूमिका निभावली. या लग्नात चक्क पोलिसांनी मंत्रोच्चार करत नवरी-नवरदेवाला सात फेरे घेण्यास सांगितले आणि सोबतच त्यांना कायद्याची माहितीही दिली. या लग्नाचं झालं असं की लग्नाच्या काही वेळ आधीच वरातीतील पाहुणे आणि नवरीकडील लोकांची हाणामारी सुरू झाली. यामुळे पंडित आणि वरातीत लोक तिथून पळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले, मात्र पंडितच पळून गेल्याने लग्न कोण लावणार? असा प्रश्न होता. अशात एका पोलिसाने पंडिताची भूमिका निभावत नवरी-नवरदेवाचं लग्न लावलं. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. अजब प्रकरण! फेरे घेताना मंडपातच पडला नवरदेव; नवरीने तिथेच लग्न मोडलं, काय घडलं? हे प्रकरण आंबेडकरनगर जिल्ह्यातील अकबरपूर तहसील भागातील कर्तोरा गावाशी संबंधित आहे. अकबरपूरच्या सदरपूर गावातून वराची मिरवणूक आली तेव्हा मद्यधुंद अवस्थेत दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर हा गोंधळ पाहून पंडितासह सर्व वरातीतील लोकही पळून गेले. दरम्यान, वधूकडील लोकांनी डायल 112 वर मदतीची याचना केली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून वधू-वर दोघांशी बोलून त्यांना लग्नासाठी तयार केलं. मात्र मंत्रपठण करण्याची पाळी आली तेव्हा तिथे एकही पंडित नव्हता. अशात लग्न कसं होणार? असा प्रश्न होता. तेव्हाच एक पोलीस मदतीसाठी समोर आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः पंडिताची भूमिका साकारण्यास होकार दिला आणि मंत्रोच्चार करून लग्न पार पाडलं. गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्याने आधी वेदमंत्रांचा उच्चार केला. त्यानंतर सात वचनांसह कायदेशीर माहितीही दिली. लोक या लग्नाचं आणि पोलिसाचं कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात