जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजब प्रकरण! फेरे घेताना मंडपातच पडला नवरदेव; नवरीने तिथेच लग्न मोडलं, काय घडलं?

अजब प्रकरण! फेरे घेताना मंडपातच पडला नवरदेव; नवरीने तिथेच लग्न मोडलं, काय घडलं?

नवरीचा मंडपातच लग्नास नकार

नवरीचा मंडपातच लग्नास नकार

नवरीच्या वडिलांनी अगदी थाटामाटात वरातीचं स्वागतही केलं. यानंतर वरमाळेचा कार्यक्रम झाला. मात्र सात फेरे घेत असताना नवरदेव मंडपातच खाली कोसळला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 24 जून : लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीला इतका राग आला की तिने थेट लग्नालाच नकार दिला. नवरीच्या या निर्णयाने एकच गोंधळ उडाला. वरातीत आलेले पाहुणे आणि नवरदेव नवरीला न घेताच रिकाम्या हाती आपल्या घरी परतले. ही घटना उत्तर प्रदेशच्या बांदामधील आहे. सांगितलं जात आहे, की फेरे घेत असतानाच दारूच्या नशेत नवरदेव मंडपताच खाली पडला. हे सगळं पाहून नवरी शॉक झाली आणि तिने ऐनवेळ लग्नास नकार दिला. यासोबतच नवरदेवाची ही बाजू लपवल्याने तिने त्याच्या कुटुंबीयांनाही सुनावलं. एका व्यक्तीने त्याच्या मुलीचं लग्न बांदाच्या लुकतरा गावातील प्रेमबाबूसोबत ठरवलं होतं. 22 जूनला वरात घरी आली. पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर देता आलं नाही, मग नवरीने दिराचाच हात पकडून घेतले सात फेरे नवरीच्या वडिलांनी अगदी थाटामाटात वरातीचं स्वागतही केलं. यानंतर वरमाळेचा कार्यक्रम झाला. मात्र सात फेरे घेत असताना नवरदेव मंडपातच खाली कोसळला. नवरदेवाचं हे रूप पाहून नवरीसह सगळेच हैराण झाले. हे पाहून नवरीने मंडपातच हे लग्न मोडलं आणि फेरे घेणं थांबवलं. नवरीने नवरदेवाच्या वडिलांनाही सुनावलं. प्रकरण जास्त वाढल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर गावातील लोकांनी हे प्रकरण शांत केलं. यानंतर नवरदेव आणि वरातीत आलेले लोकही आपल्या घरी परतले. पोलिसांनी सांगितलं, की याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात आलेली नाही. तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , marriage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात