जंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

जंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

पोलंडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Share this:

पोलंड, 20 जून : जगातील कित्येक लोकं पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर विश्वास ठेवतात, तर काही जण हा फक्त भ्रम असल्याचं म्हणतात. मात्र पोलंडमधील एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे शरीरावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत एक पांढऱ्या रंगाची हालचार करणारी आकृती स्पष्ट दिसून येते.

डेली स्टारच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ 11 मार्चचा आहे.  लेवियथन यूट्युबरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एका व्यक्तीला भीतीदायक असा आवाज ऐकू येतो. ती व्यक्ती त्या आवाजाचा मागोवा घेते, हा आवाज जंगलातून येत असतो. जसंजशी ही व्यक्ती जंगलाच्या आत जाते तसतसा आवाज वाढू लागतो. काही वेळातच ही व्यक्ती एका झाडाजवळ पोहोचते, जिथं एक पांढऱ्या रंगाची विचित्र हालचाल करणारी आकृती दिसते आणि आवाज तिथूनच येत असतो. त्या आकृतीला पाहिल्यानंतर व्यक्ती इतकी घाबरते की ती तिथून पळून जाते. हा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

हे वाचा - COVID-19 : महिन्याला 6 लाख कमवणारा वैमानिक आता झाला डिलिव्हरी बॉय

यू ट्युबवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. काही लोकांचं म्हणणं आहे की हे स्किन क्रॉलर म्हणजे नाइट क्रॉलर आहे. यूएस आणि कॅनडात ते दिसून येतात. तसे ते कुणाला नुकसान पोहोचवत नाहीत, मात्र तरी सावधानता बाळगायला हवी आणि रात्रीच्या वेळेत जंगलात जाऊ नये. तर काही जण म्हणाले असे विचित्र प्राणी जुन्या खाणी आणि गुफेतून येतात. काहींनी हे भूत असल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओच फेक असल्याचं म्हटलं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - OMG! अंड्यावर अंडी; तरुणाने ही कमाल केली तरी कशी पाहा VIDEO

First published: June 20, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading