कुआला लुंपूर, 19 जून : आतापर्यंत आपण सर्वांनी पत्त्यांचा बंगला तर बांधलाच आहे. त्यानंतर ठोकळ्यांवर ठोकळे ठेवले असतील, मात्र अंड्यावर अंडी (egg building) तुम्ही कधी ठेवलीत का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? एक अंडं साधं आधाराशिवाय उभं ठेवता येत नाही, तर अंड्यावर अंडं कसं काय ठेवणार? मात्र आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट एका 20 वर्षाच्या तरुणाने शक्य करून दाखवली आहे.
येमेनमधील तरुणाने अंड्याचा टॉवर (egg tower) तयार केला आहे. मोहम्मद मुकबेल (Mohammed muqbel) असं या तरुणाचं नाव आहे. त्याने एकावर एक अशी तीन अंडी उभी केलीत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) largest stack of eggs म्हणून याची नोंद झाली आहे. तुम्ही याआधी असं कधी पाहिलं आहे का? अशी कॅप्शन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करताना दिली आहे.
हे वाचा - कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून 'हा' तरूण झाला स्टार
मुकबेलला अंड्यांचा सेंटर ऑफ मास्क समजतं आणि त्यामुळेच तो अंड्यांची अशी बिल्डिंग तयार करू शकतो. जे सर्वसामान्य व्यक्तीसाठी अशक्य आहे. यासाठी खूप संयम आणि सरावाची गरज आहे.
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - बाप रे! गाडीच्या बोनेटवर बसला भलामोठा हत्ती, ड्रायवरनं काय केलं पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eggs, Guinness World Records, Video viral, Viral