जाहिरात
मराठी बातम्या / Viral / COVID-19 : महिन्याला 6 लाख कमवणारा वैमानिक आता झाला डिलिव्हरी बॉय

COVID-19 : महिन्याला 6 लाख कमवणारा वैमानिक आता झाला डिलिव्हरी बॉय

COVID-19 : महिन्याला 6 लाख कमवणारा वैमानिक आता झाला डिलिव्हरी बॉय

लॉकडाऊनदरम्यान छोटे उद्योगधंदे बंद पडले काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनदरम्यान छोटे उद्योगधंदे बंद पडले काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. तर अनेक व्यवसाय आणि सेवाही या कालावधीमध्ये ठप्प झाल्या होत्या. या कालावधीमध्ये बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पोटाची भूक भागवण्यासाठी मिळेल ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. याआधी केरळमधल्या एका शिक्षकानं लॉकडाऊनमुळे बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत असल्याची घटना समोर आली होती. पोटासाठी महिन्याला एकेकाळी 6 लाख रुपये कमवणाऱ्या वैमानिकानं डिलिव्हरी बॉयचं काम घेतलं आहे. आभाळा एवढी स्वप्न उराशी बाळगलेल्या या वैमानिकाला कोरोनामुळे डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागत आहे. 42 वर्षांचे Nakarin Inta मागच्या 4 वर्षांपासून वैमानिक म्हणून काम करत होते. कोरोनाच्या संकटामुळे एअरलाइन्समधील अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत. अनेक जणांना काढूनही टाकण्यात आलं आहे. कोरोनाचा फटका वैमानिकाला बसल्यानं त्यांनी पैसे मिळवण्यासाठी डिलिव्हरी बॉयचं काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याकडे सामना पोहोचवण्याचं काम आलं तेव्हा त्यांनी व्यवस्थित घरपोहोच केलं. हे काम आपण करू शकतो असा त्यांना विश्वास वाटला. मात्र त्यांना अजूनही विमानसेवेत पुन्हा रुजू होण्याची प्रतीक्षा आहे. वैमानिक होणं हे त्यांचं लहानपणापासून स्वप्न होतं असं Nakarin Inta सांगतात. हे वाचा- कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून ‘हा’ तरूण झाला स्टार हे वाचा- डोंगराच्या टोकावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप आणि…, थरकाप उडवणारा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात