अॅमस्टरडॅम, , 02 सप्टेंबर: प्रवासादरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहात (Public Toilet) जाण्याची वेळ आली तर अनेकांच्या अंगावर काटा येतो. भारतात तर सार्वजनिक स्वच्छतागृहाचं चित्र अगदीच विदारक असतं. परदेशात आपल्या तुलनेत काहीसं चांगलं चित्र असलं तरी तिथेही स्वच्छतागृहाची सफाई हा मोठा प्रश्न असतो. कारण परदेशातल्या प्रचंड आकाराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (International Airports) रोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. या विमानतळांवर स्वच्छतागृहांची संख्याही मोठी असते; मात्र तिथे येणारे अनेक प्रवासी स्वच्छतागृहाचा वापर योग्य पद्धतीनं करत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या सफाई यंत्रणेवर नेहमीच मोठा ताण असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर, जगातल्या सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या अॅमस्टरडॅमच्या विमानतळावर (Amsterdam Airport) पुरुषांच्या स्वच्छतागृहात (Men Toilet) एक अफलातून कल्पना राबवण्यात आली. यासाठी साह्यभूत ठरली आहे ती माशी (Fly). ‘ टीव्ही नाइन हिंदी ’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. माशा फिरताना दिसल्या तर ते अस्वच्छतेचं लक्षण मानलं जाते; पण इथं तर चक्क स्वच्छता ठेवण्यासाठी माशीच उपयोगाला आली आहे. मानवी स्वभावाचा अचूक वापर करून ही युक्ती योजण्यात आली आहे. ती अत्यंत प्रभावी ठरली असून, आता अनेक देशांमध्ये (Countries) सार्वजनिक ठिकाणी कंपन्या, संस्था स्वच्छतागृहात ही युक्ती वापरत असून, साफसफाईच्या खर्चात मोठी बचत होत आहे. हे वाचा - काय सांगता! घरी असलेल्या गाडीचा 300 किमी दूर कापला जातो टोल; Fast Tag मध्ये गोंधळच गोंधळ ही अतिशय साधी सोपी अशी युक्ती आहे. अॅमस्टरडॅम विमानतळावरच्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात असलेल्या युरिनलमध्ये (Urinal) माशीचे थ्री डी स्टिकर्स (Three D Sticker of Flies) लावण्यात आले. लोक जेव्हा याचा वापर करतात, तेव्हा स्वाभाविकपणे माशीवर नेम धरून मूत्रविसर्जन करतात. त्यामुळे आजूबाजूला होणारी अस्वच्छता टळते आणि साफसफाईचा खर्च कमी होतो. पूर्वी पुरुष युरिनल वापरताना त्याच्या आजूबाजूलाही मूत्रविसर्जन करत असत. त्यामुळे साफसफाईचं काम अधिक वाढत असे आणि पर्यायाने खर्चही. परंतु आता असं होत नाही. स्वच्छतागृह पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ राहण्यासही यामुळे मदत मिळत आहे. या अभिनव उपाययोजनेमुळे विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या सफाईचा खर्च (Cleaning Expense) तब्बल 8 टक्क्यांनी कमी झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.