जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ट्रेनलाही बसले भूकंपाचे तीव्र धक्के, पाहा काळजात धस्स करणारा VIDEO

ट्रेनलाही बसले भूकंपाचे तीव्र धक्के, पाहा काळजात धस्स करणारा VIDEO

ट्रेनलाही बसले भूकंपाचे तीव्र धक्के, पाहा काळजात धस्स करणारा VIDEO

भूकंपाच्या तीव्र धक्क्याने गदागदा हलली ट्रेन, पाहा काळजात धस्स करणारा VIDEO

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    तैवान: तैवानमध्ये रविवारी 6.8 तीव्रतेच्या भूकंपचे धक्के (Earthquake in Taiwan) जाणवले. यात ३ मजली इमारत कोसळली. याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची माहिती आहे. भूकंपची तीव्रता लक्षात आणून देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका रेल्वे स्थानकावर (Railway Station) प्रवासी असलेली रेल्वेगाडी रूळावरून खाली (Derailed) उतरली. तैवानमध्ये शनिवारपासून आग्नेय भागामध्ये भूकंपचे अनेक धक्के जाणवत आहेत. शनिवारी सायंकाही 6.4 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. पण रविवारी 6.8 रिश्टर स्केलचा सर्वाधिक मोठा धक्का जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, तैवानच्या उत्तर भागातील चिशांग शहराजवळ भूकंपचा केंद्रबिंदू (Earthquake Epicentre) जमिनीच्या केवळ सात किलोमीटर खाली होता. या धक्क्याने युली शहराजवळ तीन मजली इमारत (Building) उद्ध्वस्त झाली. या इमारतीच्या खाली अनेक दुकानं (Shops) होती व त्यावर लोक राहत होते. याच इमारतीचा 70 वर्षीय मालक व त्याच्या पत्नीला वाचवण्यात आल्याची माहिती एजन्सीनं दिली.

    जाहिरात

    विजेच्या तारा तुटून नुकसान भूकंपच्या धक्क्यानंतर इमारत कोसळली. याच्या ढिगाऱ्याखाली 39 वर्षीय महिला आणि तिची 5 वर्षांची मुलगी अडकली आहे. बचाव पथकाचे कर्मचारी या दोघांच्या सतत संपर्कात आहेत. दोन मजली इमारत कोसळल्यानंतर याचा ढिगारा अरुंद रस्त्यावर येऊन पडला. परिसरातील विजेच्या ताराही तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या शिवाय युली शहरातून ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यावर उभारलेला पुलही उद्ध्वस्त झालाय. 400 पर्यटक अडकले भूकंपचे तीव्र स्वरूपाचे धक्के जाणवल्यानंतर पोलीस दलाचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित आहेत. या घटनेत एक किंवा त्यापेक्षा अधिक वाहनं पुलावरून पडल्याची शक्यता आहे. हे वाचा-स्कूटीचं हँडल फिरवताच फणा काढून बाहेर आला King Cobra; 2 मिनिटातच…; थरकाप उडवणारा VIDEO ऑरेंज डे लिली फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या युलीमध्ये भूस्खलन (Landslide) झाल्याने जवळपास 400 पर्यटक अडकले असल्याची माहिती सेंट्रल न्यूज एजन्सीकडून देण्यात आली. इतरवेळी येथील डोंगरउतार ऑरेंज डे लिली फुलांनी सजलेला असतो. ते पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. सध्या इथं वीज नसल्याने मोबाइल फोनचे सिग्नलही कमी आहेत, असं एजन्सीकडून सांगण्यात आलंय. तैपेईपासून 210 किमी दूरपर्यंत जाणवले धक्के रेल्वे प्रशासनाच्या (Railway Administration) हवाल्याने एजन्सीनं भूकंपबद्दलची माहिती दिली. यात म्हटलं आहे की, युली आणि भूकंपचा केंद्रबिंदू असलेल्या चिशांगमध्ये फुलांचं शहर डोंगली आहे. हे वाचा-Taiwan Earthquake : तैवान हादरलं! 2 दिवसांत 100 पेक्षा अधिक धक्के; भूकंपाची भीषणता दाखवणारे 5 VIDEO येथील स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर (Platform) असेलली छत्री कोसळल्यानं तिथे उभी असलेली एक रेल्वेगाडी आणि तीन कोच एका बाजूला कलंडले. तर ताओयुआन शहरात क्रीडा विभागाशी निगडीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्यानं 36 वर्षीय व्यक्ती जखमी झाली. भूकंपाचे धक्के तैवानची राजधानी तैपेईपासून 210 किलोमीटर दूर ताओयुआन शहरातही जाणवले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात