कैरो, 24 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्तच्या राज्य दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते कैरो येथे पोहोचले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं. पंतप्रधान मोदी जेव्हा इजिप्तमध्ये पोहोचले तेव्हा भारतीय समुदायाच्या सदस्यांनी भारतीय तिरंगा फडकवत ‘मोदी, मोदी’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. तसंच त्यांचं शोले स्टाईल स्वागत झालं जे पाहून पंतप्रधान मोदीही भारावले. याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला भेट देत आहेत. गेल्या 26 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच इजिप्त भेट आहे. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली यांनी विमानतळावर मोदींना मिठी मारून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आलं. त्यानंतर ते एका हॉटेलमध्ये गेले. तिथं त्यांच्या नावाने घोषणा झाल्या. तसंच साडी नेसून एका इजिप्शियन महिलेने त्यांचं शोले स्टाईल स्वागत केलं. तिने ‘शोले’ चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे लोकप्रिय गाणं गायलं. प्रतीक्षा संपली! अयोध्येतील भव्य राम मंदिरात ‘या’ दिवशी विराजमान होणार रामलल्ला पंतप्रधान मोदी देखील त्या महिलेचं गाणं लक्षपूर्वक ऐकताना दिसले. त्यांनी त्या महिलेला तुला हिंदी येतं का? असं विचारलं. त्यावर त्या महिलेने आपल्याला थोडं हिंदी येत असल्याचं सांगितलं. मोदींनी तिला कधी भारतात आली होती का, असंही विचारलं. त्यावर तिने आपण कधीच भारतात आलं नसल्याचं सांगितल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तू इजिप्तची मुलगी आहेस की भारताची कन्या हे कोणालाही कळणार नाही, असं मोदी म्हणाले.
#WATCH | PM Modi receives a warm welcome from members of the Indian community at the hotel in Cairo
— ANI (@ANI) June 24, 2023
PM Modi is on a two-day State visit to Egypt pic.twitter.com/JTy2wqstEz
इजिप्त दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, ’ मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहे. मला खात्री आहे की या भेटीमुळे इजिप्तसोबतचे भारताचे संबंध दृढ होतील.भारत-इजिप्त संबंध अधिक भरभराटीस येऊ दे आणि आपल्या देशांतील लोकांना त्याचा फायदा होवो" कसा असेल पंतप्रधान मोदींचा इजिप्त दौरा? पंतप्रधान मोदी रविवारी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांची भेट घेणार आहेत. मोदी इजिप्तच्या मंत्रिमंडळासोबत गोलमेज चर्चेत सहभागी होतील, ज्याचे नेतृत्व भारतावर केंद्रीत आहे. मोदी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम आलम यांची भेट घेतील आणि नंतर इजिप्तच्या प्रमुख विचारवंतांशी चर्चा करतील. दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने जीर्णोद्धार केलेल्या 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीलाही भेट देतील. ही मशीद फातिमी राजवंशाच्या राजवटीत बांधण्यात आली होती. भारतातील बोहरा समुदाय प्रत्यक्षात फातिमी राजवंशातून आला आणि त्यांनी 1970 पासून मशिदीचे नूतनीकरण केले. ‘हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह सेमेटरी’ला भेट देतील, हे भारतीय सैन्याच्या अंदाजे 3,799 सैनिकांच्या स्मरणार्थ समर्पित आहे. ज्यांनी पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये सेवा केली आणि शहीद झाले. पंतप्रधान मोदींच्या ‘या’ योजनेमुळे गावाचं रूप पालटलं! शहरासारखे चकाचक रस्ते, शाळाही सजल्या दरम्यान एल-सिसी सप्टेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेसाठी भारताला भेट देणार आहेत, जिथे इजिप्तला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.