Home /News /viral /

विमानतळावर Emergency Landing करताच विमानाचे झाले 2 तुकडे; धडकी भरवणारा LIVE VIDEO

विमानतळावर Emergency Landing करताच विमानाचे झाले 2 तुकडे; धडकी भरवणारा LIVE VIDEO

एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं आणि धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याचे थेट दोन भागच झाले (Plane Split in Two Parts).

    नवी दिल्ली 08 एप्रिल : विमान अपघात ही काही नवीन गोष्ट नाही, पण विमान दोन भागात विभागलं गेल्याचं दृश्य सहसा पाहायला मिळत नाही. यामुळे लोक जेव्हा असा प्रकार पाहतात तेव्हा ते पाहूनच थक्क होतात. नुकतंच असंच काहीसं दृश्य सेंट्रल अमेरिकेतील देश कोस्टा रीका येथे पाहायला मिळालं. इथे एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं आणि धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याचे थेट दोन भागच झाले (Plane Split in Two Parts). स्टंटसाठी तरुणाने सायकलसह हवेत घेतली कोलांटी उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO नुकतंच कोस्टा रिकाच्या जुआन सॅनटामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दृश्य पाहायला मिळालं, ज्याने सर्वांनाच धक्का बसला (DHL plane accident in Costa Rica) . या विमानतळावर अशी दुर्घटना घडली की गुरुवारी विमानतळ बंद ठेवावं लागलं. डेली स्टारच्या वृत्तानुसार, DHL कंपनीच्या बोईंग 757-200 मालवाहू विमानाने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं आणि त्याचा भीषण अपघात झाला (Plane Crash Video). वृत्तानुसार, पायलट आणि सह-वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. सीबीएस न्यूजने या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये विमान धावपट्टीवर उतरताना दिसत आहे. काही अंतर गेल्यावर त्याचा तोल बिघडल्याचा भास होतो आणि विमान आपली दिशा बदलतं. दिशा बदलताच ते फिरतं आणि त्याचा मागील भाग तुटून वेगळा होतो. DHL ने सांगितलं की आतील क्रूला कोणतीही हानी झाली नाही. क्रू मेंबर्सला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. अजगराला पकडण्यासाठी तरुणाने पाण्यात घेतली उडी; पुढे काय घडलं बघा, थरकाप उडवणारा VIDEO रिपोर्ट्सनुसार, गौंटमाला येथे जाणाऱ्या या विमानाच्या हायड्रोलिक्स सिस्टममध्ये काहीतरी गडबड झाली होती, त्यानंतर पायलटने काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी विनंती केली. कोस्टा रिका नागरी विमान वाहतूक विभागाचे उपमहासंचालक लुई मिरांडा म्हणाले की विमान अजूनही धावपट्टीवर आहे. DHL आणि विमानतळ प्राधिकरण हे विमान इथून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डीएचएलनेही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airplane, Crash, Shocking video viral

    पुढील बातम्या