जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि..., भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video

आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि..., भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video

आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि..., भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video

दोन विमानांच्या दुर्घटनेचा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बर्लिन, 26 सप्टेंबर : रस्त्यावर दोन गाड्यांची टक्कर, ट्रेनची एकमेकांना धडक, असे अपघाताचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण कधी आकाशात दोन विमानांची टक्कर पाहिली आहे का? सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिथं दोन विमान एकमेकांना धडकलेच नाहीतर तर एकमेकांमध्ये अडकले. ही दुर्मिळ आणि भयंकर अशी दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन विमानं आकाशात उडता उडता एकमेकांना धडकले आणि एकमेकांमध्ये अडकले. व्हिडीओत पाहू शकता आकाशात दोन प्लेन उडताना दिसत आहे. दोघांमध्ये मोजकंच अंतर आहे. काही अंतरावर एकमेकांपासून दूर आहेत. हळूहळू दोन्ही विमानं एकमेकांच्या जवळ येतात आणि धडकून अडकतात. त्यानंतर तुटलेली पतंग जशी आकाशातून खाली यावी. तसे हे दोन्ही विमान खाली येऊ लागले. विमानं गोलगोल, गरागरा फिरत आकाशातून जमिनीच्या दिशेने येतात. जमिनीवर कोसळतात धुराचे लोट पसरल्याचं दिसतं. हे वाचा -  बापरे! आकाशात झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, नंतर जे घडलं ते…; धडकी भरवणारा VIDEO माहितीनुसार दोन पायलट मिरर फ्लाइटसाठी ट्रेनिंग घेत होते. यात विमान समांतर उड्डाण घेतात. या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. दोघांंनीही 2019 साली विंटेज एरोबेटिक्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब जिंकला होता.

जाहिरात

द सनशी बोलताना विमान तज्ज्ञ एंड्रियास स्पाइथ यांनी सांहितलं, दोन्ही पायलट विमानासोबत एरोबेटिक्समध्ये एकसमान ट्रेनिंग करत होते. दोघांचंही मशीन एकमेकांमध्ये अडकलं आणि दुर्घटना झाली. हे वाचा -  बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video दोन विमानांची आकाशात टक्कर झाल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी ऑगस्टमध्येही आकाशात दोन विमानांची अशीच धडक झाली होती. हा अपघात अमेरिकेतील वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर झाला. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना जीव गमवावा लागला. या अपघातानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात