साओ पाओला, 24 सप्टेंबर : अपघात, दुर्घटनेची बरीच प्रकरणं समोर येत असतात. अशाच एका दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. विजेच्या तारेला धडकून हेलिकॉप्टरला दुर्घटना झाली. या हेलिकॉप्टरमध्ये बडे नेते होते. या दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एक हेलिकॉप्टर उडताना दिसतं आहे. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत वाटतं. पण जसं हेलिकॉप्टर थोडं पुढे जातं तेव्हा त्यातून आगीच्या ठिणग्या उडालेल्या दिसतात. उडता उडता या हेलिकॉप्टरसमोर विजेची तार आली. या विजेच्या तारेला हे हेलिकॉप्टर धडकलं आणि त्यात अडकलं. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून ठिणग्याही निघू लागल्या, त्याला आग लागली. हे वाचा - बापरे! आकाशात झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, नंतर जे घडलं ते…; धडकी भरवणारा VIDEO यानंतर हेलिकॉप्टर पुढे जाईच ना. पायलटच्याही नियंत्रणात येत नव्हतं. थोडा वेळ ते तिथंच तारेत अडकलं आणि त्यानंतर आकाशातून जमिनीवर कोसळलं. गरागरा फिरत ते जमिनीवर धाडकन आदळलं. आकाशातून तुटलेली पतंग जशी खाली यावी अगदी तशाच पतंगासारखं हे विमान कोसळलं. धडकी भरवणारं असं हे दृश्य आहे. डेली मेल च्या रिपोर्टनुसार ही घटना ब्राझीलमधील आहे. या हेलिकॉप्टरमध्ये खासदार आणि उपमहापौर होते. त्यांच्यासह एकूण चार जण यात होते. खासदार आणि उपमहापौर हेलिकॉप्टरमधून मिना गेरियास राज्यात एका ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. हेलिकॉप्टर लँड करणार होतं. जमिनीपासून काही उंचावर ते होतं. तेव्हा ही दुर्घटना झाली आहे. हे वाचा - फिल्मी स्टाईल राडा! भरधाव कारने हवेत उडवलं तरी तरुण करत राहिले फायटिंग; Watch Video सुदैवाने विमान जमिनीपासून फार उंचावर नव्हतं. त्यामुळे जसं हेलिकॉप्टर कोसळलं तसं तिथं असलेले लोक धावले आणि त्यांनी हेलिकॉप्टरमधील लोकांना बाहेर काढलं. सर्वच्या सर्व सुरक्षित आहेत. पण खबरदारी म्हणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.