मराठी बातम्या /बातम्या /Viral /गोरं मुल जन्माला येताच संपवतात त्याचं आयुष्य! भारतीय 'या' राज्यात अत्यंत क्रूर परंपरा

गोरं मुल जन्माला येताच संपवतात त्याचं आयुष्य! भारतीय 'या' राज्यात अत्यंत क्रूर परंपरा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

इथे गोरं मुल जन्माला येणं म्हणजे शाप, भारतातील 'या' भागात विचित्र परंपरा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : बऱ्याच पालकांना आपली मुलं गोरी आणि सुंदर दिसावीत असं वाटत असतं. त्यासाठी अनेक महिला गरोदर असताना देखील आपल्या आहारात बदल करतात. तसेल मुलांच्या जन्मानंतर त्यांना वेगवेगळं तेल लावलं जातं, ज्यामुळे ही मुलं गोरी होतात असा त्यांचा समज असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात असा एक भाग आहे. जिथे लोकांना गोरी मुलं नको असतात. तसेच जर गोऱ्या मुलाचा जन्म झालाच, तर येथील लोक त्याला काळं आणि कुरुप करण्याचा प्रयत्न करतात. तर कधी गोऱ्या मुलांना मारलं देखील जातं.

हो हे खरं आहे, आता तुम्हा प्रश्न पडला असेल की असं का? आणि हे लोक असं का करतात, चला या आगळ्या वेगळ्या आणि विचित्र परंपरेबद्दल जाणून घेऊ.

हे ही पाहा : तरुण तरुणीकडून कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, Video पाहून अंगावर येईल काटा

भारताच्या केंद्रशासित प्रदेश अंदमानमध्ये 'जारवा' नावाची जमात राहते. जगातील सर्वात जुन्या जमातींमध्ये या जमातीचा समावेश होतो.

जारवा जमातीत एक क्रूर प्रथा प्रचलित आहे, येथे गोऱ्या रंगाचे मुल जन्माला आले तर त्याला मारले जाते. कारण या लोकांचा असा समज आहे की गोरं मुल जन्माला येणं म्हणजे एक शाप आहे.

काय आहे ही क्रूर परंपरा?

जरावा जमाती ही मूळ आफ्रिकेतील मानली जाते. जमातीतील बहुतेक लोक काळ्या त्वचेचे म्हणजेच काळ्या रंगाचे असल्याचे मानले जाते.

अशा स्थितीत जर एखाद्या महिलेने पांढऱ्या मुलाला जन्म दिला तर त्याला मारले जाते, कारण ते मूल दुसऱ्याच जमातीचे आहे असे त्यांना वाटते. जारवा आदिवासींमध्ये आणखी एक अनोखी परंपरा दिसून येते की येथे जन्मलेल्या मुलाला संपूर्ण कुळातील महिलांचे दूध पाजले जाते.

हे ही पाहा : भारतातील 'या' गावात हिंदू-मुस्लिम सगळ्याचं एकच आडनाव, यामागचं कारण ही फारच रंजक

सर्व महिलांचे स्तनपान हे समाजाची पवित्रता राखण्यासाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ही जमात 90 च्या दशकात समोर आली होती, परंतु भारत सरकारने त्यांचे फोटो काढणे किंवा सोशल मीडियावर अपलोड करण्याबाबत कठोर कायदे केले आहेत. तसेच जर कोणी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताना आढळले तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते आणि दंडही होऊ शकतो.

जरावा जमातीत अंधश्रद्धेची मुळे खूप खोलवर आहेत. गरोदर महिलेला प्राण्याचे रक्त पाजल्यास तिचे मूल काळे होईल, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. इथे फक्त काळ्या रंगाच्या मुलालाच समाजात राहण्याची मान्यता मिळते. असे सांगितले जाते की जारवा जमात आजही मुख्‍य प्रवाहातील समाजापासून विना कपड्यांचे जीवन जगत आहे आणि या आदिवासी जमातीतील बहुतेक लोक माशांची शिकार करून आपले जीवन जगतात.

First published:

Tags: Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral